शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मॅगीविरुद्धच्या तक्रारीची सरकारकडून गंभीर दखल

By admin | Updated: May 30, 2015 09:07 IST

नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला लक्ष घालण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनाच्या दर्जाबद्दल निर्माण झालेल्या वादानंतर सरकारने या प्रकरणात अन्नसुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाला (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) लक्ष घालण्यास सांगितले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे तक्रार करण्यात आली तर सामूहिक खटलादेखील होऊ शकतो, असे ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी म्हटले.उत्तर प्रदेश अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने नेस्ले इंडियाला फेब्रुवारी २०१४ मध्ये उत्पादन झालेली मॅगीची बॅच बाजारातून काढून घेण्यास सांगितले होते. मॅगीची चव वाढविणाऱ्या एमएसजीचे व शिशाचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा जास्त असल्याचे या बॅचमध्ये (फेब्रुवारी २०१४) आढळल्यानंतर प्रशासनाने हा आदेश दिला होता. नेस्ले इंडियाने प्रशासनाच्या तक्रारीशी सहमत नसल्याचे सांगून आम्ही या प्रकरणी दाद मागू, असे म्हटले. मॅगीविरुद्धची तक्रार गंभीर असून आम्ही ती अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणकडे सोपविली आहे. सध्याच्या कायद्यानुसार या प्राधिकरणाला दंड ठोठावण्याचा आणि मोठी शिक्षा करण्याचा अधिकार आहे, असे पासवान यांनी म्हटले. वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी उत्पादनाशी संबंधित तक्रारींची हाताळणी वेगवेगळे अधिकारी करतात. आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेले हे प्राधिकरण अन्न विषयाच्या तक्रारी हाताळते, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)