शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूल कार्यकर्त्यांच्या हल्ल्यामध्ये ज्येष्ठ मार्क्सवादी नेते जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:10 IST

पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात असलेल्या पंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने तेथील वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर मार्क्सवादी, भाजपा व काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना उघडपणे धमकावण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात असलेल्या पंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने तेथील वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर मार्क्सवादी, भाजपा व काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना उघडपणे धमकावण्यास सुरुवात केल्याच्या तक्रारी आहेत. माकपचे ज्येष्ठ नेते व ९ वेळा खासदार असलेले वासुदेव आचार्य यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकी मारहाण केली, की त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.त्यांना डोक्याला जबर मारहाण करण्यात आली असून, त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. वासुदेव आचार्य हे शांत प्रवृत्तीचे व अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. संसदेतही त्यांनी आपल्या कामाचा व भाषणांचा ठसा उमटवला होता. त्यांची प्रकृती सुधारत असली तरी त्यांना आणखी काही काळ रुग्णालयात ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. वासुदेव आचार्य हे ७५ वर्षांचे आहेत.वासुदेव आचार्य पक्ष कार्यकर्त्यांसह पुरुलिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तृणमूलच्या धाकधपटशाची तक्रार करण्यासाठी जात असताना ते व सोबतच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हटले आहे.माकपचे आंदोलनवासुदेव आचार्य यांना आमच्या कार्यकर्त्यांनी अजिबात मारहाण केलेली नाही, असा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमधील पंचायतीच्या ६0 हजार जागांसाठी १, ३ व ६ मे रोजी निवडणुका होणार आहेत.तृणमूलच्या गुंडगिरीच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी आज कोलकात्याच्या मेयो रोडवरील गांधीजींच्या पुतळ्यापाशी धरणे धरले होते, तर माकपच्या कार्यकर्त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.