शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बातमीसाठी पाकीट पाठवितो

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्‍याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मासिक लेवाशक्ती प्रकाशन सोहळ्यात केले.

जळगाव : सामाजिक, राजकीय काम करीत असताना आमचीही बातमी व छायाचित्र वृत्तपत्रात छापुन येतात, तेही मोठ मोठे छापुन येतात, मात्र बर्‍याच वेळा कार्याची दखल घेतली जात नसल्याने बातमी येण्यासाठी पाकीटे पाठवितो, असे धक्कादायक विधान महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मासिक लेवाशक्ती प्रकाशन सोहळ्यात केले.
औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात ते बोलत होेते. ते पुढे म्हणाले की समाजातील यशस्वी बांधवांचा कार्याचा गौरव व्हायला हवा, आमचाही क ार्याचा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून होत असतो, छायाचित्र छापून येत असतात, मात्र काही वेळा छापले जात नाहीत, त्यासाठी पाकीटे पाठवितो, बातमीचे.....असे विधान केले. तसेच लेवा पाटील समाजाने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. मात्र समाजाचा सन्मान होताना दिसत नाही. कारण समाज विखुरला गेला असून त्यात दुरावा देखील निर्माण झाला आहे. यशस्वी झालेल्या आपल्या या समाज बांधवांचा गौरव आपणच करायला हवा, यासाठी समाजातील दुरावा दुर करण्यासाठी एकत्र या, असे आवाहनही त्यांनी कार्यक्रमाद्वारे केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लेवा पाटील समाजाचे कुटुंब प्रमुख रमेश विठोबा पाटील होते. तर व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पद्मश्री शितल महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार गुरूमुख जगवानी, माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. अर्जुन भंगाळे, माजी महापौर विष्णु भंगाळे, उद्योजक गौरव अत्तरदे, नरेंद्र भर्‍हाटे, मिलिंद चौधरी, उपमहापौर सुनिल महाजन, कुंदन ढाके, शेेखर पाटील आदी उपस्थित होते.

इन्फो -
जळगावात आय.टी.पार्क उभारण्याचा मानस
खासदार असल्याने खेड्या पाड्यात फिरावे लागते, मात्र फिरताना घरातील कर्ते तरुण कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेले असल्याने घरात फक्त वृद्ध आई वडीलच दिसले. जेव्हा उतारवयात त्यांना मुलांची गरज आहे, तेव्हाच मुले सोडून गेल्याचे हे चित्र कुठेतरी बदलायला हवे, त्यासाठी सरकारच्या मदतीने जळगावात आय.टी.पार्क उभारण्याचा मानस आहे. जेणेकरून तरुणांना नोकरी स्थानिक ठिकाणीच मिळेल आणि आई वडीलांना उतारवयात सहारादेखील मिळेल. यासाठी मात्र जिल्‘ातील सर्व नेत्यांनी एकत्र यायला हवे.
-रक्षा खडसे, खासदार