शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

वृत्तपत्रांच्या अनधिकृत पीडीएफ प्रती पाठवणे कॉपीराईट व आयटी अ‍ॅक्टचा भंग- दिल्ली उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 02:42 IST

ई-पेपरची प्रत बनवून वितरित केल्याने न भरून येणारे नुकसान होते

- खुशालचंद बाहेती मुंबई : समाजमाध्यमांवर विशेषत: व्हॉटस्अ‍ॅपवर फिरणाऱ्या वृत्तपत्राच्या अनधिकृत पीडीएफ प्रती या अनैतिक तर आहेतच; पण स्वामीत्व अधिकार कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणाºयाही आहेत.वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनाचे वृत्तपत्रांवर, ई-वृत्तपत्रावर इतकेच नव्हे, तर त्यातील मजकुरावर स्वामीत्व अधिकार असतो. त्यामुळे त्याच्या अनधिकृतपणे प्रती बनविणे व त्या प्रसारित करणे हा स्वामीत्व अधिकार कायद्याचा भंग ठरतो.ई-पेपरवरून या प्रती पीडीएफ फॉरमॅटमध्ये बनवल्या जातात आणि त्या वृत्तपत्रातर्फे अधिकृतपणे प्रसारित होत आहेत, असे दर्शविण्यात येते. या प्रतीमध्ये अनेक वेळा मूळ प्रतीतील मजकुराशी छेडछाड केलेली असते. वृत्तपत्राच्या मूळ व्यवस्थापनाला याबद्दल कल्पनाही नसते.वृत्तपत्रातील मजकूर बनवताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, संसाधने, तंत्रज्ञान, आर्टवर्कचा उपयोग करण्यात येतो. वृत्तपत्र तयार करून वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात असते.वृत्तपत्रातील प्रचंड मेहनतीने बनवलेला मजकूर अनेकांना प्रसारित केल्याने किंवा संकेतस्थळावर टाकल्याने तो वैयक्तिक उपयोगापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक ठरतो. स्वामीत्व कायद्याप्रमाणे वृत्तपत्राच्या व्यवस्थापनासच यातील मजकूर पुन्हा प्रकाशित करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा प्र्रकारे पुन्हा प्रकाशित करणारा प्रत्येक जण स्वामीत्व कायद्याचा भंग करीत असतो. वृत्तपत्र व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय डिजिटल आवृत्तीचे प्रसारण हा माहिती तंत्रज्ञान कायद्याचाही भंग ठरतो.माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ४३ प्रमाणे संगणकीय माहितीत फेरबदल करणे, नष्ट करणे याबरोबरच त्याचे मूल्य कमी होईल, असा प्रयत्न करणे, यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असा प्रयत्न करणाºया व्यक्तीकडून नुकसानभरपाई घेण्याची तरतूद या कायद्यात आहे. वृत्तपत्रांचे अनधिकृत प्रसारण करणारे जनहितार्थ करीत असल्याचा दावा करतात; पण माहिती तंत्रज्ञान कायद्यात ही सबब अपवाद ठरत नाही.एका वृत्तसमूहाने त्यांच्या वृत्तपत्रातील मजकुराचे अनधिकृत प्रसारण ‘टेलिग्राम’ या मेसेजिंग अ‍ॅप वरून होत असल्याची व तो बंद व्हावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ई-पेपरची प्रत बनवून ती वितरित केल्याने वृत्तपत्रांचे न भरून येणारे नुकसान होते, असे म्हणत हे थांबवण्याचा आदेश दिला आहे.यापूर्वी इंडियन न्यूज पेपर सोसायटी या वृत्तपत्रांच्या सर्वोच्च संघटनेने अशा वितरणावर आक्षेप घेत टीका केली होती. या मूळ वृत्तपत्रांची आर्थिक हानी तर होतेच; पण वृत्तपत्रांच्या नावावर फेक न्यूजचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची शक्यता निर्माण होते, असे मत आय.एन.एस.ने व्यक्त केले होते.