शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भू विधेयकावरील विरोधकांच्या बैठकीला सेनेची हजेरी

By admin | Updated: July 29, 2015 00:38 IST

नवी दिल्ली : भाजपाप्रणित रालोआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने वादग्रस्त भूसंपादन विधेयकाविरुद्ध आणखी प्रखर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्त्या हाणून पाडण्यासाठी डावपेच आखण्याच्या दिशेने विरोधकांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेने हजेरी लावली.

नवी दिल्ली : भाजपाप्रणित रालोआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने वादग्रस्त भूसंपादन विधेयकाविरुद्ध आणखी प्रखर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्त्या हाणून पाडण्यासाठी डावपेच आखण्याच्या दिशेने विरोधकांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेने हजेरी लावली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांची हजेरी होती. काँग्रेसचे के.व्ही. थॉमस, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, वायएसआर काँग्रेसचे खासदार व्ही. प्रसादराव वेलागापल्ली आणि माकपाचे मोहम्मद सलीम या बैठकीत सहभागी झाले. प्रस्तावित भूसंपादन विधेयकाला शिवसेनेचा संपूर्ण विरोध नाही, मात्र यातील काही तरतुदींवर शिवसेनेस आक्षेप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचा हेतू एक संयुक्त दुरुस्त्या वा शिफारसी सादर करण्याची शक्यता तपासणे हा होता.
भूसंपादन विधेयकाच्या समीक्षेसाठी संसदेची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. भाजपा खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने ५ ऑगस्टपर्यंत आपला अहवाल सोपविण्याच्यादृष्टीने आणखी दोन दिवसांची मुदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस व अन्य काही विरोधी पक्ष संयुक्त दुरुस्त्यांसह अहवाल सादर करण्यावर जोर देत आहेत. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मंगळवारी आपल्या शिफारशी या समितीकडे सोपवल्या. २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. माकपा लवकरच आपल्या शिफारशी समितीला सोपवणार आहे. बीजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने रालोआ सरकारने हे विधेयक मागे घेण्याची मागणी करीत यापूर्वी आपल्या शिफारशी समितीस सोपवल्या आहेत. संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्यात मोदी सरकार करू इच्छित असलेल्या दुरुस्त्या हाणून पाडण्यासाठी काँगे्रसने नेटाने प्रयत्न चालवले आहेत. यासाठी संयुक्त समितीतील सदस्यांना ऐनकेनप्रकारेण आपल्याकडे वळविण्याचे काँग्रेसचे डावपेच आहेत.