शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीचा मोह अंगलट, गंगेत बुडून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2016 19:51 IST

सेल्फी घेणं वाईट नसलं, तरी विचित्र सेल्फी घेण्याच्या नादात दाखवलेला निष्काळजीपणा कसा जिवावर बेतू शकतो

ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. 23 - सेल्फी घेणं वाईट नसलं, तरी विचित्र सेल्फी घेण्याच्या नादात दाखवलेला निष्काळजीपणा कसा जिवावर बेतू शकतो, याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गंगा नदीत सेल्फी घेण्याच्या मोहात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे, असं वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं दिलं आहेकानपुरात गंगा नदीत मजामस्ती करण्यासाठी सहा विद्यार्थी पाण्यात उतरले. याचवेळी त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या नादात एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेले इतर पाचजणही बुडाले. सहा जणांना बुडताना पाहून किनाऱ्यावर बसलेला युवक मकसूद अहमद त्यांच्या मदतीला गेला, मात्र तोही बुडाला. पोलिसांनी आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले असून आणखी एकाचा शोध सुरु आहे.कानपुरात विनोबानगरमध्ये राहणारा सत्यम गुप्ता हा एलएलबीचा विद्यार्थी होता. सकाळपासून पडणारा पाऊस आणि आल्हाददायी वातावरणामुळे त्यांना गंगेत डुंबण्याचा मोह झाला. त्यामुळे भाऊ शिवमसह, शेजारचे रोहित, गोलू, संदीप गुप्ता आणि सचिन गुप्ता या मित्रांसह त्याने नदीवर जाण्याचा प्लॅन आखला.सहा जणांच्या मृत्यूसाठी स्थानिकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. घटनेची माहिती दिल्यानंतर दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहचल्यामुळे युवक बुडाल्याचं म्हटलं जात आहे.