शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कायाकल्प योजनेंतर्गत पहिल्या पाचमध्ये जिल्हा रुग्णालयाची निवड

By admin | Updated: October 6, 2016 00:08 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी कायाकल्प योजनेत राज्यातील पहिल्या पाच रुग्णालयांमध्ये नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची निवड झाली आहे़ नाशिक, वर्धा, नंदुरबार, पुणे व बुलढाणा या रुग्णालयांना प्रत्येकी एक बक्षीस निश्चित मिळणार असून एका विशेष समितीतर्फे प्रथम तीन क्रमांकासाठी या रुग्णालयांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे़

नाशिक : जिल्हा रुग्णालयांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी कायाकल्प योजनेत राज्यातील पहिल्या पाच रुग्णालयांमध्ये नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाची निवड झाली आहे़ नाशिक, वर्धा, नंदुरबार, पुणे व बुलढाणा या रुग्णालयांना प्रत्येकी एक बक्षीस निश्चित मिळणार असून एका विशेष समितीतर्फे प्रथम तीन क्रमांकासाठी या रुग्णालयांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे़ राज्य शासनाच्या विविध समितीच्या केलेल्या तपासणीत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयास चांगले गुण मिळाल्यास राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळण्याची शक्यता आहे. राज्यस्तरीय तीन सदस्यीय समितीमार्फत शनिवारी (दि़ १) ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात आली होती. या समितीने जिल्हा रुग्णालयातील कामांचे कौतुक केले होते. जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, कामकाजाचे स्वरूप या त्रिसदस्यीय समितीने जाणून घेतले होते़ तसेच रुग्णालयातील दस्तऐवज, नोंदी, औषधे याची माहिती या समितीने घेतली होती. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. होले यांच्यासह रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी केलेल्या कामामुळेच पहिल्या पाचमध्ये रुग्णालयाची निवड झाली आहे़पहिल्या पाच क्रमांकात निवड झालेल्या रुग्णालयांची पुन्हा एकदा समितीकडून तपासणी केली जाणार आहे़ यानंतर रुग्णालयांची राष्ट्रीय पारितोषिकांसाठी निवड होणार असून केंद्रीय समितीमार्फत ही तपासणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)