शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची जप्त लघु सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन : १९ लाख ८३ हजारांची रक्कम थकित

By admin | Updated: July 27, 2016 19:17 IST

जळगाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी शिवारात लघुसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ११ हेक्टर ६८ आर जागेचे भूसंपादन करीत वाढीव मोबदल्याची १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम न दिल्यामुळे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची व संगणक बुधवारी दुपारी १२ वाजता जप्त करण्यात आले.

जळगाव : पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी शिवारात लघुसिंचन प्रकल्पाच्या कामासाठी ११ हेक्टर ६८ आर जागेचे भूसंपादन करीत वाढीव मोबदल्याची १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम न दिल्यामुळे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची व संगणक बुधवारी दुपारी १२ वाजता जप्त करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील साजगाव मोहाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी १९९५ मध्ये ३१ शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या संदर्भात शेतकर्‍यांनी जिल्हा न्यायालयात वाढीव मोबदला मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानुसार २००८ मध्ये अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर शासनाने याबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने २०१० मध्ये शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय दिला होता. शासन वाढीव मोबदला देत नसल्याने दिलीप पुंडलिक चौधरी या शेतकर्‍याने १९ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात जप्ती वॉरंटसाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने ६ जून रोजी जप्तीचे आदेश काढले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करता यावी यासाठी शेतकर्‍याने याबाबत कार्यकारी अभियंता यांना सांगितले होते. मात्र त्यानंतरही दखल घेतली गेली नाही.
बुधवारी शेतकरी दिलीप चौधरी हे ॲड.अशोक चौधरी यांच्यासह गोलाणी मार्केटमधील लघुसिंचन जलसंधारण विभाग (जि.प.) या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांना न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखविली. तसेच खुर्ची व संगणक जप्त करीत असल्याची माहिती दिली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नाईक यांची खुर्ची व संगणक जप्त करण्यात आले.

कोट
पाचोरा तालुक्यातील साजगाव, मोहाडी येथील लघुसिंचन प्रकल्पासाठी दिलीप चौधरी या शेतकर्‍याच्या जमिनीचे भूसंपादन केले होते. जिल्हा व उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शासनाकडून पैसे दिले जात नसल्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांची खुर्ची व संगणक जप्त केले आहे.
ॲड.अशोक चौधरी, शेतकर्‍याचे वकील.