शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

सेहवाग भारताचा नाही तर BCCI चा प्रतिनिधी - उमर खालिद

By admin | Updated: March 1, 2017 08:34 IST

विरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) प्रतिनिधित्व करतो, भारताचं नाही अशी टीका उमर खालिदने केली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमधील वादामध्ये विद्यार्थिनी गुरमेहर कौरच्या समर्थनार्थ मैदानात उतरणा-यांमध्ये जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांच्यानंतर आता जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदचं नाव जोडलं गेलं आहे. क्रिकेटर विरेंद्र सेहवागच्या ट्विटवर आक्षेप घेत उमर खालिद बोलला आहे की, 'विरेंद्र सेहवाग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) प्रतिनिधित्व करतो, भारताचं नाही'.
 
(दिल्ली युनिव्हर्सिटीच्या वादात सेहवागची उडी, केलं धमाकेदार ट्विट) 
 
गुरमेहर कौरच्या समर्थनार्थ उमर खालिदने फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. उमर खालिदने लिहिलं आहे की, 'विरेंद्र सेहवाग बीसीसीआयसाठी खेळतो, तो भारताचं प्रतिनिधित्व करत नाही. मंगळवारी दिल्ली युनिव्हर्सिटीत जमा झालेले हजारो विद्यार्थी आणि शिक्षक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले, ते भारताचं प्रतिनिधित्व करतात. ते एका नव्या भारताचं प्रतिनिधित्व करता जो समानता, न्याय आणि स्वातंत्र्यावर आधारित आहे'.
 
एकीकडे अभिनेता रणदीप हुडा याने सेहवागचं समर्थन केलं तर दुसरीकडे जावेद अख्तर आणि नसीरुद्दीन शाह यांनी मात्र याचा विरोध केला. कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगटदेखील या ट्विटर वॉरमध्ये सहभागी झाले आणि गुरमेहरच्या विरोधात उभे राहिले. जावेद अख्तर यांनी कुस्तीपटूंना कमी शिकलेले म्हणत टोला मारल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. यानंतर योगेश्वरसहित गीता फोगट आणि तिचे वडिल महावीर फोगट, बहिण रितू फोगट यांनी ट्विट करत उत्तर दिलं. दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीदेखील शिक्षणाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नाही असं मत व्यक्त करत जावेद अख्तर यांना सुनावलं. रात्र होईपर्यंत अनुपम खेर यांच्यासहित अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी या ट्विटर वॉरमध्ये सहभागी झाले होते.
 
(गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा)
(देशभक्ती पुस्तकातून येत नाही - जावेद अख्तर यांना बबिता फोगाटचे प्रत्युत्तर)
(हाच तो व्हिडीओ ज्यामुळे गुरमेहर कौरवर होतेय टीका)
 
गेल्या बुधवारी डीयूमध्ये उमर खालीद आणि शहला रशीद यांना बोलावले होते. त्यातून अभाविप व एआयएसए यांच्यात वाद होऊन विद्यापीठात राडा झाला होता. निरपराध विद्यार्थ्यांना मारहाण, तसेच विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्याचे प्रकार घडले होते. यामुळे संतप्त गुरमेहरने सोशल मीडियावर ‘मी अभाविपला घाबरत नाही’ ही मोहीम सुरू केली.
 
(गुरमेहर कौरचा दिल्ली सोडण्याचा निर्णय)
(अभाविपविरुद्ध बोलणाऱ्या तरुणीला बलात्काराची धमकी)
 
 गुरमेहर कौरने सोशल मीडियावर मोहीम सुरु केल्यानंतर तिला बलात्काराची धमकी देण्यात आली होती, ज्यानंतर दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला होता. भाजपा नेत्यांनी गुरमेहरला लक्ष्य केल्यानंतर विरोधी नेते तिच्या बचावासाठी धावले आहेत, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी गुरमेहरचे मन कोणी प्रदूषित केले, असा सवाल केला, तर काही भाजपा नेत्यांनी या तरुणीपेक्षा दाऊद इब्राहिम बरा, या पातळीवर जात टीका केली.
 
रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेवर गुरमेहर कौरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर ''माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं'' असं लिहीलेलं होतं. गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. यानंतर गुरमोहर चर्चेत आली होती. यानंतर सेहवागने गुरमोहरच्या या ट्विटला उत्तर दिलं होतं. 'मी दोन वेळेस त्रिशतक झळकावलं नाही तर माझ्या बॅटने त्रिशतक झळकावलं', असं खिल्ली उडवणारं ट्विट सेहवागने केलं.
 
अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. डीयूत शिकत असलेली गुरमेहर कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. दरम्यान, गुरमेहरने तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
 
 गुरमेहरच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, भाजपा नेत्यांनी तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बलात्काराच्या धमक्या दिल्याची तक्रार गुरमेहरने सोमवारी दिल्ली महिला आयोगाकडे केली. त्यानंतर, आयोगाने गुरमेहरला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना दिल्या. गुरमेहरने तिच्या तक्रारीत पुरावे म्हणून बलात्काराच्या धमकीचे स्क्रीनशॉट दिले आहेत.
 
या सर्व वादानंतर गुरमेहरने देशभक्ती आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मोर्चात आपण सहभागी होत नसल्याचं गुरमेहर कौरने ट्विट करुन सांगितलं. 'मी मोहिमेतून माघार घेत आहे. सर्वांचं अभिनंदन. मला एकटीला सोडावं अशी विनंती करते. मला जे बोलायचं होतं, ते मी बोलले आहे', असं ट्विट गुलमेहरने केलं. यावेळी तिने इतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही केलं. 
 
सेहवागने केली टिंगल
गुरमेहरने गेल्या आठवड्यात फेसबुकवर, ‘मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे,’ हा मेसेज टाकताच, वर्गमित्र आणि इतर विद्यार्थ्यांनी तिची पोस्ट शेअर केली, पण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आदींनी तिची ‘राजकीय प्यादे’ अशी संभावना केली. सेहवागने तर तिची टिंगलच केली.
 त्यावर ती म्हणाली, ‘त्यांनी माझी देशभक्तीची कल्पना समजलेली नाही. शिवाय ही राजकीय चळवळ नाही. हा मुद्दा विद्यार्थ्यांशी आणि आमचा परिसर हिंसक धमक्यांपासून मुक्त करण्याशी संबंधित आहे. कोणीही कोणाला बलात्काराची धमकी देऊ शकत नाही.’
 
दाऊद बरा : भाजपा नेते
भाजपाचे खासदार प्रताप सिन्हा यांनी, ‘गुरमेहरपेक्षा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरा,’ या भाषेत तिच्यावर टीका केली.
 
काँग्रेसचा भाजपावर हल्ला
भाजपा नेत्यांनी कारगिल शहिदाच्या मुलीविरुद्ध वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली. रिजिजू आणि सिन्हा यांची विधाने फॅसिस्ट मानसिकतेचे परिपूर्ण उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचे विचार कदाचित तुम्हाला पटणार नाहीत. म्हणून मग धमक्या देणे योग्य नाही. हे प्रकार लोकशाहीत बसणारे नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.