सुरेश प्रभू : रेल्वे मंत्रलयाचा पदभार स्वीकारला
नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा आणि ग्राहक सेवा हा आपला प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही सुरेश प्रभू यांनी सोमवारी रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर दिली. रेल्वेच्या क्षमतेचा ख:या अर्थाने उपयोग करण्यात येईल, असे प्रभू म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना प्रभू म्हणाले, भूतकाळात आम्ही रेल्वेच्या संचालनात अनेक आव्हानांचा सामना केलेला आहे. आमच्याजवळ क्षमता आहे; परंतु त्याचा योग्यरीत्या उपयोग झाला नाही. पंतप्रधानांनी रेल्वेची परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन बाबींकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत. एक ग्राहक सेवा आणि दुसरी रेल्वे सुरक्षा. कारण प्रवाशांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
जनतेने सरकारवर मोठा विश्वास टाकलेला आहे, असे नमूद करून प्रभू म्हणाले, रेल्वेमंत्री म्हणून मी कोणती पावले उचलणार हे येत्या काही दिवसांत दिसेल. रेल्वे हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे आणि रेल्वेचा विकास झाला तर आर्थिक विकास होईल.
राज्यवर्धन सिंग राठोड
राज्यवर्धन सिंग राठोड यांनीही सोमवारी माहिती व प्रसारण राज्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना राठोड म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर सरकारने सर्वप्रथम देशाची अर्थव्यवस्था, प्रतिष्ठा व सुरक्षा परत रुळावर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहेत. अरुणजी आणि मी तुमच्यासाठी उपलब्ध होण्याचा आणि दुतर्फा संवाद साधण्याचा प्रय} करू. (वृत्तसंस्था)
4माहिती व प्रसारण हे अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्रलय असून सरकार व मंत्र्यांच्या माहितीचे आदानप्रदान याचद्वारे होत असते, असे अरुण जेटली म्हणाले.
4जेटली यांनी प्रकाश जावडेकर यांच्याकडून या मंत्रलयाचा कार्यभार हाती घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
4मी यापूर्वीही या खात्याचा मंत्री होतो. त्यावेळी इलेक्ट्रॉनिकपेक्षा प्रिंट मीडियाचा प्रभाव होता. आज डिजिटल माध्यमांचा विस्तार झाला आहे.
देशाची सुरक्षा बळकट करण्यासाठी प्रयत्नशील
4शेजारी देशांसोबतचे संबंध हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. देशाची सुरक्षा बळकट बनविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि शत्रूविरुद्ध आम्ही संरक्षणविहिन असणार नाही, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी केले आहे.
4देशाच्या सुरक्षेबाबत विचारले असता र्पीकर म्हणाले, ‘मी आज माध्यमांपुढे सुरक्षाविहिन आहे; परंतु शत्रूविरुद्ध आम्ही कधीही सुरक्षाविहिन असणार नाही. मी संरक्षणमंत्री बनल्याचे मला रविवारी रात्री 11.35 वाजता कळले. मला थोडा वेळ द्या. या मंत्रलयात रुळायला मला वेळ लागेल.
सशस्त्र दलांच्या बळकटीसाठी कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे आपण अधिक लक्ष देणार असल्याचे म्हणाले.