शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Twitter ने दुस-यांदा गायक अभिजीत यांची टिवटिव केली बंद

By admin | Updated: May 30, 2017 08:06 IST

नव्याने अकाऊंट चालू केल्यानंतर अभिजीत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी मी राष्ट्रविरोधींच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 30 - गायक अभिजीत भट्टाचार्य यांच नवीन अकाऊंट ट्विटरने पुन्हा सस्पेंड केले आहे. @singerabhijeet हे नवीन टि्वटर अकाऊंट चालू केल्यानंतर काही तासांच्या आत टि्वटरने पुन्हा त्यांच अकाऊंट सस्पेंड केले. या अकाऊंटवर अभिजीत स्वत: टि्वट करु शकत नाहीत तसेच ते अकाऊंटही कोणाला पाहता येणार नाही. अभिजीत टि्वटरचा गैरवापर करत असून महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरत असल्याची तक्रार अनेक टि्वटर युझर्सनी केल्यानंतर मागच्या मंगळवारी टि्वटरने त्यांच अकाऊंट सस्पेंड केले होते. 
 
नव्याने अकाऊंट चालू केल्यानंतर अभिजीत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये त्यांनी मी  राष्ट्रविरोधींच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. हे माझे ट्विटरचे नवीन अकाऊंट आहे. जोपर्यंत माझे खरे अकाऊंट सुरु होत नाही. तोपर्यंत माझ्या या अकाऊंटला फॉलो करा. या व्यतिरिक्त माझ्या नावची सर्व ट्विटर अकाऊंट बनावट असून माझी प्रतिष्ठा खराब करत आहेत, असे अभिजीत भट्टाचार्य यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. 
 
त्याचबरोबर, वंदे मातरम्... मी परत आलोय... राष्ट्रविरोधी माझा आवाज बंद करु शकत नाहीत... भारतीय लष्कराला सलाम. हे माझे नवीन ट्विटर अकाऊंट आहे. बाकी सर्व बनावट आहेत...अशी कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिली आहे. अभिजीत भट्टाचार्य कोणत्या-ना-कोणत्या विषयावर वादग्रस्त ट्विट करुन चर्चेत येत होते. यावर ट्विटरच्या काही युजर्सनी सतत त्यांच्या आयडीला रिपोर्ट केले. त्यानंतर ट्विटरने याची दखल घेत अभिजीत भट्टाचार्य यांचं ट्विटर अकाउंटच बंद करण्याचा निर्णय घेतला. 
 
दरम्यान काळात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी ज्या लष्करी अधिका-याने दगडफेक करणा-या जमावापासून बचाव करण्यासाठी काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढालीसारखा वापर केला. त्या अधिका-याने युवकाऐवजी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवे होतं असं टि्वट केले होतं. त्यांच्या या ट्विटचं अभिजीत भट्टाचार्य यांनी समर्थन केलं होतं.  केवळ समर्थन नाही तर, परेश रावल यांच्यापेक्षाही एक पाऊल पुढे टाकत त्यांनी अरुंधती रॉय यांना जीपला बांधून गोळ्या घालायला हव्यात, असं ट्विट केलं होतं.