शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पु्न्हा भूकंप, नेपाळ व उत्तर भारत हादरला

By admin | Updated: May 12, 2015 20:50 IST

मंगळवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नेपाळ व उत्तर भारत हादरला असून नेपाळमध्ये २९ तर भारतात १७ जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - नेपाळमध्ये अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या  भूकंपाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच मंगळवारी दुपारी नेपाळ व उत्तर भारत पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले असून नेपाळमध्ये २९ तर बारतात १७ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नेपाळमधील कोडारी येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी होती. तेथे सुमारे ९८१ जण जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपात सात हजाराहून अधिक जण ठार तर १५ हजारांहून अधिक जखमी झाले होते. नेपाळवासी त्या धक्‌यातून सावरत असतानाच आज त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला.

मंगळवारी दुपारी १२.३५ मिनीटांनी व १२.३८ मिनीटांनी नेपाळमध्ये मोठ्या तीव्रतेचे धक्के बसले. यातील पहिला भूकंपाचा केंद्रबिंद कोडारी येथे होता तर दुसरा भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळ - चीन सीमारेषेजवळ होता. पहिला भूकंप ७.१ तर दुसरा भूकंप ७.४ रिश्टर स्केल ऐवढा तीव्रतेचा होता. यानंतर आणखी एक भूकंपाचा धक्का बसला. लागोपाठ आलेल्या तीन भूकंपाचे धक्के  उत्तर व पूर्व भारतातील दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम, ओदिशा अशा अनेक राज्यांमध्येही जाणवले. गुजरातमधील अहमदाबादपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अफगाणस्तानमध्येही भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपात जीवितहानी व वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भूकंपामुळे पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण पसरले आहे. भूकंपानंतर नेपाळचे काठमांडू विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आले असून भारतातही खबरदारी म्हणून दिल्ली, कोलकाता येथील मेट्रो सेवा बंद करण्यात आली. तर सुप्रीम कोर्टाचे कामकाजही काही वेळ थांबवण्यात आले होते. येत्या ३० मे पर्यंत नेपाळमधील सर्व शाळाही बंद राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालय भूकंपाविषयीची माहिती घेत असून नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.