शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुसर्‍याच दिवशी टाकल्या रोपांनी माना दोन कोटी वृक्ष लागवड : कुंभारखोरीमध्ये झाडांना पाणी नाही, प्लास्टिक अस्ताव्यस्त

By admin | Updated: July 3, 2016 00:32 IST

जळगाव : दोन कोटी वृक्ष लागवड अभियानात शुक्रवारी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित लाखो रोपटे लावली. मात्र त्यांची काय स्थिती आहे अथवा त्यांची देखभाल व्हावी यासाठी कोणीही फिरकत नसल्याने वृक्षारोपणाच्या दुसर्‍याच दिवशी रोपट्यांनी माना टाकल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जळगाव : दोन कोटी वृक्ष लागवड अभियानात शुक्रवारी जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित लाखो रोपटे लावली. मात्र त्यांची काय स्थिती आहे अथवा त्यांची देखभाल व्हावी यासाठी कोणीही फिरकत नसल्याने वृक्षारोपणाच्या दुसर्‍याच दिवशी रोपट्यांनी माना टाकल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी सकाळपासून शासकीय कर्मचार्‍यांसह सर्वांमध्ये वृक्षारोपणाचा उत्साह होता. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपवाटिकेतून तालुकानिहाय रोपांचे वाटप करण्यात आले होते. काही सेवाभावी संस्थांतर्फेही मोफत रोपांचे वाटप झाले. शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला होता. वनविभागातर्फे १३ हजार वनमजुरांच्या मदतीने या रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी १४ लाख ५४ हजार ८५५ खड्डे तयार करण्यात आले होते. या वेळी वृक्षारोपण करून अनेकांनी सेल्फीही काढून घेतले.
दुसर्‍या दिवशी या रोपांची काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी लोकमतने ठिकठिकाणी भेट दिली असता दिसून आलेले हे चित्र असे....

कुंभारखोरी...
कुंभारखोरी उद्यानात शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला होता. या वेळी नेते, अधिकारी वर्ग येथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याच ठिकाणी रोपांची गंभीर स्थिती असल्याचे दिसून आले. काल रोपं तर लावली गेली मात्र आज येथे पाण्याअभावी ती गळून पडल्याचे चित्र येथे आहे. जास्त उंचीची रोपं तर हवेने खाली वाकून गेली आहे.

प्लास्टिक पिशव्या तेथेच पडून....
रोप तर लावली मात्र त्यांच्या प्लास्टिक पिशव्या जागोजागी पडलेल्या आहेत. या सोबतच पाण्याचे पाऊचही येथे अस्ताव्यस्त पडलेले आहे. हेच प्लास्टिक इतरत्र पसरुन त्यामुळे नुकसान होऊ शकते. ते उचलण्याचीही कोणी तसदी घेतलेली नाही.
येथील रोपांना पिंजरा (ट्री गार्ड) लावलेले नाही. त्यामुळे हवेने ते खाली पडण्यास मदत होत आहे.
खड्डे खोदल्यानंतर रोपं लावली व त्यातील माती थोडीफार खड्यात टाकली, मात्र इतर मातीचे ढीग तसेच पडून आहे.

मेहरुण चौपाटी....
मेहरुण परिसरात लावलेल्या झाडांना पिंजरा (ट्री गार्ड) लावलेले आढळून आले. सोबतच येथे जैन इरिगेशनच्या बंबाद्वारे पाणी दिले जात होते. एकूणच रोपं सुस्थितीत आहे.

लांडोरखोेरी....
या ठिकाणी काही रोपं बाजूला पडलेली दिसून आली. मात्र ही रोपं येथे लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. येथे नियोजनबद्ध काम सुरू असल्याचे आढळून आले.