शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

आयुक्तांच्या अधिकारांना कात्री

By admin | Updated: January 13, 2017 00:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिल्ली विद्यापीठातील १९७८ मध्ये बीए उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिल्ली विद्यापीठातील १९७८ मध्ये बीए उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे (रेकॉर्ड्स) तपासण्याचे आदेश देणारे माहिती आयुक्त एम. एस. आचार्यलू यांच्या अधिकारावर गदा आणण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी मुख्य माहिती आयुक्त आर. के. माथुर यांनी काढून घेतली आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास अर्थात, शिक्षण खात्याशी संबंधित माहितीच्या अधिकारांबाबत कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. आचार्यलू यांनी दोनच दिवसांपूर्वीच दिल्ली विद्यापीठातील कागदपत्रांच्या तपासणीचा आदेश दिला होता. मंगळवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, मानव संसाधन विकास मंत्रालयाशी संबंधित सगळ््या तक्रारी आणि अपील्स, यापुढे आणखी एक माहिती आयुक्त मंजुला पाराशर या बघतील. कोणत्या आयुक्तांकडे कोणता विषय द्यायचा, याचा विशेष हक्क मुख्य माहिती आयुक्तांना आहे. पंतप्रधानांच्या बीएच्या पदवीबाबत आम आदमी पार्टीने शंका घेतली असून, त्यासंबंधीची कागदपत्रे माहिती अधिकारात मागितली आहेत. ती देण्यास दिल्ली विद्यापीठाने नकार दिला होता. ते प्रकरण आचार्यलू यांच्याकडे गेल्यावर मात्र, त्यांनी  माहिती देण्याचे आदेश विद्यापीठाला दिले. (लोकमत न्युझ नेटवर्क)१९७८ मध्ये किती विद्यार्थ्यांनी बीएची पदवी मिळवली, त्यांची नावे, त्यांच्या वडिलांची नावे आणि त्यांनी मिळवलेले गुण यांची माहिती नीरज नावाच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत मागितली होती. ती देण्यास विद्यापीठाच्या मध्यवर्ती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. मात्र, ही माहिती देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.