स्कॉटलंड
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
स्कॉटलंडचा शानदार विजय
स्कॉटलंड
काठेगल्लीतील घटना : चार संशयितांना पोलीस कोठडी : मालमत्तेच्या वादाची खून केल्याची शक्यतानाशिक : काठेगल्लीतून गुरुवारी (दि़५) रोजी अपहरण केलेल्या वृद्धेचा खून करून तिचा मृतदेह माळशेज घाटातील दरीमध्ये फेकून दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, यातील चार संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली़ यातील तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून, तिच्या सुनेलाही संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़काठेगल्लीतील रवींद्र शाळेसमोरील सर्वोत्तम सोसायटीत कैलास राधेशाम शर्मा हे पत्नी एकता, दोन मुले व आई शांतीदेवी (६२) यांच्यासमवेत राहतात़ गुरुवारी (दि़५) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी एकता या मुलांना शिकवणीसाठी सोडवून घरी येत असताना इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळून एक ग्रे रंगाची कार जोरात निघून जात असल्याचे पाहिले़ त्यांनी घरात जाऊन पाहिले असता सासू शांतीदेवी व घरातील बेडशीटही आढळून आले नाही़ यानंतर शोध घेऊनही त्या न सापडल्याने त्यांनी दुसर्या दिवशी भद्रकाली पोलीस ठाण्यात सासूचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली़या प्रकरणी पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भदक्राली पोलिसांनी एकता शर्मा यांच्या बहिणीचा पती संशयित अशोककुमार माणिकचंद शर्मा, आनंद धोंडीराम जगताप, आनंदराज जेकब नाडर यांना अटक केली़ या तिघांना न्यायालयात हजर केले असता शर्मा यास १६ फेब्रुवारीपर्यंत, तर जगताप व नाडर यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ या तिघांचीही कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी शांतीदेवी यांचे अपहरण व खून करून मृतदेह माळशेज घाटातील दरीत फेकून दिल्याचे सांगितले़त्यानुसार आज भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नाईक, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक पाटील, शेळके, चव्हाण, इंगळे, महेश हिरे यांनी कर्मचार्यांसह घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला़ या प्रकरणी पोलिसांनी या तिघा संशयितांसह शांतीदेवी यांची सून एकता शर्मा यांनाही अटक केली आहे़ मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (प्रतिनिधी)फोटो :- आर / फोटो / १०भद्रकाली महिला खून नावाने सेव्ह केला आहे़