शाळा-महाविद्यालय पा-२
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
कमला नेहरू महाविद्यालय
शाळा-महाविद्यालय पा-२
कमला नेहरू महाविद्यालय नागपूर : अहमदनगर येथील कोपरगाव शिर्डी येथे आयोजित योगा स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालयाच्या सुमीत हलबे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियम येथे आयोजित सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत पवन खराटे या विद्यार्थ्याने कास्यपदक प्राप्त केले. तसेच महाविद्यालयातील भार्गवी पवार या विद्यार्थिनीने तामिळनाडू येथे आयोजित टेक्निक्वॉईट स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव ॲड. अभिजित वंजारी, प्राचार्य डॉ. अरविंद शेंडे, उपप्राचार्य डॉ. प्रदीप दहीकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन नागपूर : म्हाळगीनगर चौक रिंगरोड येथील मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन येथे रोटरी क्लब ईशान्य नागपूरतर्फे विद्यार्थ्यांसाठी दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. प्रवीण उंबाडे आणि डॉ. शरयू बोमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या चमूने आपली सेवा प्रदान केली. शाळेच्या अध्यक्षा शीला मुडे, पर्यवेक्षिका संध्या चौधरी, आर.शिंदे उपस्थित होते. सोमलवार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय नागपूर : स्व. वसंतराव वांकर स्मृतिनिमित्त टिळक विद्यालय धंतोली येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील समृद्धी यावलकर हिने प्रथम व वैभवी हिर्लेकर हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव पी.पी. सोमलवार यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.