शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद मागण्यांना केवळ पाठिंबा : बहुतांशी संस्था सुरूच

By admin | Updated: December 9, 2015 23:55 IST

नाशिक : शासनाचे शिक्षण धोरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत शिक्षण बचाव समितीने दिलेल्या दोन दिवसीय शाळा बंदला जिल्‘ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्‘ातील निम्म्याहून अधिक शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव जाणवला नाही. आता गुरुवारी प्रतिसाद मिळावा, यासाठी बचाव समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक : शासनाचे शिक्षण धोरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत शिक्षण बचाव समितीने दिलेल्या दोन दिवसीय शाळा बंदला जिल्‘ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्‘ातील निम्म्याहून अधिक शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव जाणवला नाही. आता गुरुवारी प्रतिसाद मिळावा, यासाठी बचाव समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.अनुदान पात्र शाळांना अनुदान नाही, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा रखडलेला प्रश्न, शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रोजी रोटीवर गंडांतर आणणारा आकृतिबंध रद्द करावा, अशा राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून आंदोलने करण्यात येत असून, बुधवारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस शाळा बंदची राज्यस्तरावर हाक देण्यात आली होती. नाशिकमध्ये या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्‘ात मोठ्या संख्येने शाळा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीसह अनेक संस्थाचालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु प्रत्यक्ष सहभाग मात्र घेतला नाही. व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटी आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या दोन संस्थांच्या शाळा मात्र बंद होत्या. अनेक संस्थाचालकांनी मागण्या रास्त असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे या शाळा सुरू होत्या.शिक्षण बचाव समितीचे नाशिकचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी मात्र जिल्‘ातील ७० टक्के शाळा बंद होत्या. मंगळवारी सायंकाळी शाळा बंदचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांपर्यंत निरोप पोहोचते झाले नाही, त्यामुळे उर्वरित शाळा सुरूच होत्या, असा दावा केला. अशा होत्या शाळा बंदअनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा एकूण ९३१ शाळांपैकी ४०९ शाळा बंद होत्या. यात अनुदानित २७५, विनाअनुदानित ९५, कायम विनाअनुदानित ३९ शाळांचा समावेश आहे. उच्च माध्यमिक ३२५ शाळांपैकी १७ शाळा बंद होत्या, तर २९० प्राथमिक शाळा असून त्यापैकी अवघ्या ३१ शाळा बंद होत्या.