एस.बी. स्पोर्टस् संघाला दुहेरी मुकुट
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST
राज्य आट्यापाट्या स्पर्धा
एस.बी. स्पोर्टस् संघाला दुहेरी मुकुट
राज्य आट्यापाट्या स्पर्धा पणजी : खड्डे केपे येथे गोवा आट्यापाट्या असोसिएशन, स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ गोवा व एस.बी. स्पोर्टस् खड्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या अखिल गोवा आट्या-पाट्या स्पर्धेचे विजेतेपद एस.बी.स्पोर्ट्स संघाने पटकाविले. या स्पर्धेत तीस संघांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा सिनीअर, ज्युनियर व सब ज्युनियर मुला-मुलींच्या गटात खेळविण्यात आली. बाळ्ळी केपे पंचायतीचे उपसरपंच श्री. भामट वेळीप यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलीत करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एस.बी. स्पोर्टस् क्लबचे सदस्य राजू परवार यांनी सर्वांचे स्वागत केले. आट्या पाट्या असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत (बाबू कवळेकर) यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हा खेळ शालेय खेळात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कवळेकर यांनी यावेळी दिले. विजयी संघ - पुरुष - प्रथम- एसबी स्पोर्टस् क्लब खड्डे, द्वितीय - महादेव संघ पाडी, तृतीय एसबी. स्पोर्टस क्लब. महिला गॅलॅक्सी संघ खड्डे, द्वितीय - एसबी स्पोर्टस् ख्हडे, तृतीय- सेव्हन स्पोर्टस् क्लब पाडी. ज्युनियर मुले. प्रथम- एसबी स्पोर्टस् खड्डे, द्वितीय - महादेव स्पोर्टस् क्लब पाडी, तृतीय- एफ.सी. बोर्से. ज्युनियर मुले- प्रथम सरकारी हायस्कूल पाडी, द्वितीय - भारत माता कुंकळ्ळी, तृतीय - एसबी स्पोर्टस् खड्डे.