शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे पठाणकोट हे भारताचेच नाटक

By admin | Updated: April 6, 2016 08:14 IST

पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते, असा आरोप केला आहे. जेआयटीच्या या आरोपाबाबतचे वृत्त ‘पाकिस्तान टुडे’त प्रसिद्ध झाले आहे. पठाणकोटच्या तपासासाठी नुकतेच भारतात येऊन गेलेले हे पथक पंतप्रधान नवाज शरीफ यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालाची माहिती जेआयटीच्या एका सूत्राने पाकिस्तान टुडेला दिली. भारताला हल्ला होण्यापूर्वीच दहशतवाद्यांविषयी माहिती होती, असा भयंकर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. जेआयटीने एनआयए अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येचाही संदर्भ दिला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी झालेल्या या हत्येतून भारत हे प्रकरण दडपत असल्याचे स्पष्ट होते, असेही या अहवालात नमूद आहे. भारतीय लष्कर आणि कथित दहशतवादी यांच्यातील संघर्ष अवघ्या काही तासांत संपला. यावरून हा हल्ला पाकची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले नाट्य होते, असे स्पष्ट होते. हल्ल्याच्या रात्री तळावरील दिवे सुरू नव्हते. यावरून भारताला दहशतवाद्यांची आधीच माहिती होती की काय असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमे किंवा जेआयटीने भारतावर पुरावे लपविल्याचा आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे आरोप करण्यात आलेले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी जेआयटीला पुरावे व माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे वृत्त दुनिया न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने २८ मार्च रोजी दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पाकिस्तानी जेआयटीच्या या अहवालाबाबत आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे याच जेआयटीने काही दिवसांपूर्वी हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे कबूल केले होते. एवढेच नाहीतर या दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहंमद या संघटनेशी संबंध जोडण्याइतपत पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचेही म्हटले होते.हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे डीएनए अहवाल, दूरध्वनी नोंदी आणि पठाणकोट हवाई तळाच्या कमांडरची माहिती जेआयटीला देण्यात आली नाही, असे डेली टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे, तर हल्ल्याबाबत भारत सरकार आणि सीमा सुरक्षा दलाच्या भूमिकेतच विरोधाभास असल्याचा दावा दुनिया न्यूजच्या वृत्तात करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी दहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवर चढून पठाणकोट हवाई तळावर प्रवेश केल्याचे भारतीय प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, दहशतवाद्यांनी चढाईसाठी वापरलेले दोरखंड कुठेही आढळून आले नाहीत, असेही या अहवालात नमूद आहे.