शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाखाची रोकड ठेवलेली पेटी लांबवली वॉचमनच्या घरात चोरी : कर्ज फेडण्यासाठी विकली होती रिक्षा विक्री

By admin | Updated: May 27, 2016 19:53 IST

जळगाव: कर्ज फेडण्यासाठी रिक्षा विक्रीतून आलेले एक लाख २० हजार रुपये व चांदीचे दागिने असा एक लाख २३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज ठेवलेली पेटीच श्रावण जोरसिंग जाधव (मूळ रा.ढेकू तांडा ता.अमळनेर) या वॉचमनच्या झोपडी वजा घरातून चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव: कर्ज फेडण्यासाठी रिक्षा विक्रीतून आलेले एक लाख २० हजार रुपये व चांदीचे दागिने असा एक लाख २३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज ठेवलेली पेटीच श्रावण जोरसिंग जाधव (मूळ रा.ढेकू तांडा ता.अमळनेर) या वॉचमनच्या झोपडी वजा घरातून चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रावण जाधव हे दिवसा रिक्षा चालवतात व रात्री बांधकामाच्या ठिकाणी वॉचमनचे काम करतात. सध्या ते पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी पत्नी लताबाई, मुलगा नितीन, संदीप व सून मायाबाई असे एकत्र झोपडी वजा घर करून राहतात. जाधव यांच्याजवळ असलेली रिक्षा (क्र.एम.एच.१९ बी.जे.८५१६) सुभाष उत्तम चव्हाण (रा.धोबी वराड, ता.जळगाव) यांच्या नावावर असून तिचे बॅँकेचे हप्ते जाधव हेच भरतात. कर्ज झाल्यामुळे त्यांनी ही रिक्षा नातेवाईक असलेले ईश्वर बल्लु चव्हाण (रा.जिन्सी अबोडा ता.रावेर) यांना एक लाख २० हजार रुपयात विक्री केली होती. त्याचे एक लाख २० हजार रुपये रोख मिळाले होते.
पत्नीच्या पेटीत ठेवली रोकड
जाधव यांनी ही रक्कम पत्नी लताबाई यांच्याजवळ दिली होती. त्यांनी त्यांच्या पत्र्याच्या पेटीत ही रक्कम ठेवली होती त्यात पाच तोळे चांदीचे कडे व गाडीचे कागदपत्रे, नितीनचे लायसन्सही ठेवले होते. गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर जाधव हे बांधकामाच्या ठिकाणी झोपायला गेले, मुले बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये झोपले तर पत्नी लताबाई व सून मायाबाई या घरात झोपल्या. तेथे खाटेखाली ही पेटी ठेवली होती. सकाळी सहा वाजता बांधकामावर पाणी मारायचे असल्याने लताबाई या उठल्या असता खाटेखालची पेटीच गायब झालेली होती.
इन्फो...
ढसाढसा रडल्या लताबाई...
रात्रंदिवस राब राब राबतो, तरी कर्ज फिटत नाही. पोटभर जेवायला मिळत नाही. कर्जाच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी रिक्षा विकली व तीच रक्कम चोरी झाल्याने आता काय करू..अशा शब्दात लताबाई या ढसाढसा रडत पोलीस स्टेशनला गेल्या. तेथे ही आपबिती ऐकून पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी बाहेर रवाना केले.
(सुधारीत)