सावरगाव....
By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST
विष प्राशन करून इसमाची आत्महत्या
सावरगाव....
विष प्राशन करून इसमाची आत्महत्यासावरगाव : दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन करून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना नजीकच्या मेंडकी येथे घडली. सदर इसमाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुनील संतोष रक्षित (३२) असे मृताचे नाव आहे. सुनीलने रविवारी दारूच्या नशेत कुठले तरी विषारी औषध प्याले. ही बाब त्याच्या कुटुंबीयांना कळताच त्याला नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुनील हा आपल्या वडिलांसह शेती करीत होता. सततची नापिकी व कर्जाचा बोझा यामुळे तो चिंतित होता. दरम्यान, त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. (वार्ताहर)