शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
4
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
5
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
6
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
7
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
8
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
9
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
10
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
11
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
12
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
13
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
14
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
15
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
16
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
17
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
18
बचाव मोहिमेंतर्गत ताडोबातील गंभीर अवस्थेतील छोटा मटका वाघ जेरबंद; 'ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर'ला हलवलं
19
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
20
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?

जखमीला वाचविण्यासाठी तरुणाने पगडी उतरवली

By admin | Updated: May 18, 2015 02:51 IST

रस्त्यावर कार अपघातात जखमी झालेल्या ५ वर्षाच्या मुलाचा रक्तस्राव थांबविण्यासाठी २२ वर्षाच्या शीख युवकाने धार्मिक प्रतीक असणारी आपली पगडीही

मेलबर्न : रस्त्यावर कार अपघातात जखमी झालेल्या ५ वर्षाच्या मुलाचा रक्तस्राव थांबविण्यासाठी २२ वर्षाच्या शीख युवकाने धार्मिक प्रतीक असणारी आपली पगडीही उतरवल्याची घटना न्यूझीलंडमध्ये घडली असून, या युवकावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हरमनसिंग असे या युवकाचे नाव असून, अपघात झाला तेव्हा तो आपल्या घरी आॅकलंड येथे होता. पाच वर्षाचा मुलगा आपल्या बहिणीबरोबर शाळेत जात असताना त्याला कारने धक्का दिला. अपघाताचा आवाज ऐकून हरमनसिंग धावत घटनास्थळी आला व त्याने पाहिले तेव्हा छोट्या मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्याने क्षणभरही विचार केला नाही. आपली पगडी उतरवली व त्या मुलाचे डोके बांधले. या क्षणाचे छायाचित्र घटना पाहणाऱ्या गगन धिल्लाँन नावाच्या युवकाने काढले. न्यूझीलंड हेराल्डमध्ये ते प्रसिद्ध झाल्यानंतर हरमनसिंग एका रात्रीत हीरो बनला. फेसबुकवर त्याला शेकडो हिरोग्राम आले. अमेरिका, युरोप व भारतातून सदिच्छांचा वर्षाव होत असल्याने हरमन भारावला आहे. या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची प्रकृती सुधारत आहे. गगन धिल्लाँन म्हणतो, शीख तरुणाने पगडी उतरवणे ही घटना दुर्मिळ आहे. अपघातग्रस्त लहान मुलाला वाचवण्यासाठी हरमनने हे पाऊल उचलले, मला त्याचा अभिमान वाटतो. हरमनसिंग भारतीय असून, आॅकलंडमध्ये शिक्षणासाठी राहत आहे. येथील एका बेकरीमध्ये तो काम करतो. (वृत्तसंस्था)