शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

सौरभ भारद्वाज बनले आता 'बेरोजगार नेता', पराभवानंतर उघडले YouTube चॅनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:26 IST

Saurabh Bharadwaj : ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झालेल्या सौरभ भारद्वाज यांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल उघडले आहे.

Saurabh Bharadwaj : नवी दिल्ली : नुकत्याच दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यात सौरभ भारद्वाज यांच्याही समावेश आहे. या पराभवानंतर आता सौरभ भारद्वाज हे युट्यूब (YouTube) चॅनलकडे वळले आहेत.  

ग्रेटर कैलाश मतदारसंघातून पराभूत झालेल्या सौरभ भारद्वाज यांनी स्वतःचे युट्यूब चॅनेल उघडले आहे. सौरभ भारद्वाज यांनी आप्लया यूट्यूब चॅनलचे नाव 'बेरोजगार नेता' असे ठेवले आहे. तसेच, "आज असे म्हणता येईल की, आमच्यासारखे नेते बेरोजगार झाले आहेत", असे सौरभ भारद्वाज यांनी यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या पहिल्या ५८ सेकंदांच्या व्हिडिओत म्हटले आहे.

सौरभ भारद्वाज म्हणाले की, "दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने माझे आयुष्य १८० अंशांनी बदलले आहे, आता  यूट्यूब चॅनेलद्वारे दररोज लोकांशी संवाद साधणार आहे. अनेक लोक व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर माझ्याशी संपर्क साधत आहेत. राजकारण्याच्या आयुष्यात काय घडते, ते मला तुम्हाला सांगायचे होते. मी सर्वांना उत्तर देईन."

पुढे व्हिडिओमध्ये सौरभ भारद्वाज म्हणाले,"मी माझ्या विचारांद्वारे लोकांशी संपर्क साधेन आणि त्यांना प्रश्न विचारेन, त्यांना माझ्या योजनांबद्दल सांगेन आणि निवडणूक हरल्यानंतर राजकारण्याच्या आयुष्यात कोणते बदल होतात, हे देखील सांगेन. या चॅनेलद्वारे मी माझा प्रवास शेअर करू इच्छितो आणि या प्रश्नांची थेट उत्तरे देऊ इच्छितो."

"उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज"उदरनिर्वाहासाठी पैसे कमवण्याची गरज असल्याचे सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. प्रत्येकाला वाटते की एकदा आमदार किंवा खासदार झाला की त्याला पैशांची गरज नाही, पण माझ्या बाबतीत तसे नाही. आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. माझी टीम देखील चॅनेलद्वारे काही मदत करण्यास  तयार आहे, असे सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.

"पराभवाचा अनुभव शेअर करणार"निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल सुद्धा सौरभ भारद्वाज बोलणार आहेत. ते म्हणाले, "ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ पोस्ट करेन. जिंकल्यावर प्रत्येकजण आपल्या अनुभवांबद्दल बोलतो. मी माझ्या पराभवाचा अनुभव सांगेन आणि आपण त्यावर चर्चा करू. तसेच, बरेच लोक मला व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर लिहित आहेत, मी त्यांची मते देखील विचारात घेईन", असेही सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूक