शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरबच्या राजदूताचा नेपाळी महिलांवर बलात्कार

By admin | Updated: September 9, 2015 13:37 IST

सौदी अरबच्या राजदूताने व त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप दोन नेपाळी महिलांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - सौदी अरबच्या राजदूताने व त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप  दोन नेपाळी महिलांनी केला आहे. तसेच त्याची पत्नी व मुलीने आपल्याला डांबून ठेवून शारिरिक छळ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौदी दूतावासाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 
गुडगावमधील एका इमारतीतील पाचव्या मजल्यावर दोन नेपाळी महिलांचा छळ होत असल्याची माहिती मैती इंडिया या एनजीओला मिळाली असता त्यांनी या प्रकरणाची माहिती गुडगाव पोलिसांना देऊन सोमवारी रात्री  त्या दोन्ही महिलांची सुटका केली.
नेपाळमधील भूकंपानंतर आम्हाला भारतात आणण्यात आले, चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासनही आम्हाला मिळाले होते. अनेक महिन्यांपासून आम्ही त्याच्या घरी काम होतो, मात्र आम्हालला पगारातील १ रुपयाही देण्यात आला नाही. तो माणूस सतत आमचा छळ करत असे आणि चाकूचा धाक दाखवून आमच्यावर बलात्कार करत असे. कित्येक वेळेस त्याचे मित्र घरी येत व तेही आमच्यावर अत्याचार करत, अशी माहिती पीडित महिलांनी दिली आहे. तसेच त्या राजदूताची पत्नी व मुलीनेही आम्हाला डांबून ठेवत, आमचा शारीरिक छळ केला, कित्येक दिवस उपाशीही ठेवले, असेही त्या महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राजदूतीच पत्नी व तिच्या मुलीवर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान या दोन्ही महिलांना नेपाळी दूतावासाच्या मदतीने पुन्हा नेपाळला पाठवण्यात येईल, असे अधिका-यांनी सांगितले.