शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

केजरींच्या साडवासाठी सत्येंद्र जैन यांनी केला जमिनीचा सौदा

By admin | Updated: May 8, 2017 19:55 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्या कपिल मिश्रा यांनी आज पुन्हा एकदा केजरीवाल

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.  8 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्या कपिल मिश्रा यांनी आज पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांच्या साडवासाठी 50 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केला होता. असा आरोप मिश्रा यांनी केला. तसेच सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत उद्या सकाळी 11.30 वाजता सीबीआयकडे यासंदर्भातील पुरावे आपण सोपवणार असून, त्याबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगितले. 
मिश्रा यांनी आज केजरीवाल यांच्यावरील आरोपांची मालिका नव्याने सुरु केली. आपने पंजाब विधानसभा आणि दिल्लीतील पालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि सौदेबादी केल्याचा आरोप त्यांनी केला. 
कपिल मिश्रा पुढे म्हणाले. "आपचे नेते संजय सिंह यांनी या व्यवहाराशी संबंधित माणसाचे नाव विचारले होते. ही व्यक्ती केजरीवाल यांचा साडू आहे. सत्येंद्र जैन यांनी बंसल कुटुंबासाठी हा व्यवहार केला होता." काहीही झाले तरी मी आप सोडणार नाही.  मी भाजपाचा एजंट असल्याचे आरोप होत आहेत. पण भाजप, काँग्रेस आणि मोदी यांच्या भ्रष्टाराचाविरोधात मी भक्कमपणे लढा दिला आहे. जर मी भाजपाचा एजंट असेन तर संजय सिंह आणि केजरीवाल यांनी तसे पुरावे द्यावेत, तसेच माझ्यावर भ्रष्टाचाराचेही कुठले आरोप नाही आहे, असे आव्हानही मिश्रा यांनी दिले.  
 
( मिश्रांनी केजरीवालांच्या 400 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे केले सादर)
 
दरम्यान,  कपिल मिश्रा यांनी आज दिल्लीतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीला केजरीवाल जाणूनबुजून उशीर करत असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे. 
 
(  केजरीवालांनी २ कोटी घेतले )
 
एसीबीकडे पुरावे दिल्यानंतर त्यांनी केजरीवाल कशा प्रकारे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत, हेही अधिका-यांना सांगितलं आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की, मंत्री नसतानाही याची चौकशी करून त्याचा अहवाल केजरीवालांना सुपूर्द केला होता. त्यावेळी मी टँकर घोटाळ्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची शिफारस केली होती. मिश्रा म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहका-यांशी संबंधितही टँकर घोटाळ्यातसंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांवरून शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट होत आहे.