शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खाणकामांवर निगराणीसाठी उपग्रहांची मदत

By admin | Updated: December 20, 2015 22:59 IST

अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहांकडून मिळणाऱ्या चित्रांच्या मदतीने देशातील अवैध खाणकाम हुडकून काढण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे.

 दिल्ली : अंतराळ तंत्रज्ञान आणि उपग्रहांकडून मिळणाऱ्या चित्रांच्या मदतीने देशातील अवैध खाणकाम हुडकून काढण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) सहकार्य घेणार आहे.राज्यांना आपल्या खाणींचे उपग्रहांमार्फत छायाचित्र घेण्यासाठी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आणि प्रत्येक १५ ते ३० दिवसांत ते नियमितपणे अद्ययावत सांगितले जाईल. यामुळे अधिकाऱ्यांना अवैध खाणकाम सुरू असलेल्या ठिकाणांचा शोध घेणे आणि खनिजांच्या उत्खननाला आळा घालण्यात मदत मिळेल. याबाबत राज्यांशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि या योजनेची अंमलबजावणी पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.नागरिकांना उत्तम आणि प्रभावी सेवा पुरविण्यासाठी इस्रोशी सहकार्य करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या प्रारंभी खनन आणि शहर विकास मंत्रालयासह अन्य काही मंत्रालयांना दिलेले होते. अवैध खाणकामांवर निगराणी ठेवण्यासाठी सरकारने योजना तयार केल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. प्रमुख खनिज पदार्थांचा शोध घेण्यासाठी इंडियन ब्युरो आॅफ माईन्स (आयबीएम) आणि इस्रो यांच्यादरम्यान स्वाक्षरी होणार असलेल्या सामंजस्य कराराचा (एमओयू) मसुदा आयबीएमद्वारे तयार करण्यात आलेला आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.