शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपग्रह धोरण तातडीने गतिमान करावे

By admin | Updated: November 7, 2015 01:59 IST

उपग्रहांद्वारे पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयीचे धोरण महाराष्ट्राने तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असून तसे झाल्यास दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांपर्यंत

- राजू नायक, नवी दिल्लीउपग्रहांद्वारे पडताळणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याविषयीचे धोरण महाराष्ट्राने तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असून तसे झाल्यास दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहोचू शकतील, असे मत ‘सीएसई’चे शास्त्रज्ञ अर्जुन श्रीनिधी यांनी व्यक्त केले.विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सीएसई) वातावरण बदलावर पत्रकारांसाठी येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना श्रीनिधी यांनी महाराष्ट्राने उपग्रहाचे तंत्रज्ञान वापरण्याच्या कार्यक्रमास गती देण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. सद्यस्थितीत काही मोजकेच उपग्रह बाजारभाव व पिकांविषयीच्या माहितीचे संकलन आणि हस्तांतरण करत आहेत. रडारसेटद्वारे तर सर्व प्रकारचे हवामान, भूपृष्ठाची सुस्पष्ट छायाचित्रे उपलब्ध होत असतात. ज्यावरुन पिकाविषयीच्या सद्यस्थितीची माहिती मिळू शकते आणि नैसर्गिक व अन्य कारणांमुळे झालेल्या वैयक्तिक हानीचा अचूक निष्कर्षही काढला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर ५०० गावांतून ही योजना कार्यान्वित होईल आणि कालांतराने ती राज्यभर राबविली जाईल. सध्याच्या व्यवस्थेमुळे अनेकदा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष झालेले नुकसान आणि मिळालेली भरपाई यात प्रचंड तफावत असते. मात्र उपग्रह मॅपिंगद्वारे मिळणाऱ्या अचूक माहितीमुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या वैयक्तिक नुकसानीचा थेट पुरावा उपलब्ध होतो.हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या खासगी कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण असण्याची गरज आहे. खासगी कंपन्यांमुळे विमा कंपन्यांना लाभ होत असल्याने त्यांचे संगनमत असते; पण दुर्दैवाने शेतकरीही खासगी कंपन्यांच्या अंदाजांच्या नादी लागून तोंडघशी पडतात. - सुनीता नारायण, सरसंचालिका, सीएसई यंदाचे पर्जन्यमान सर्वसाधारण असेल, असा अंदाज खासगी कंपन्यांनी वर्तविला होता. प्रत्यक्षात शेतकरी यंदा अवर्षणाचा सामना करत आहे. देशातील खासगी हवामान कंपन्यांसाठी कोणतीच नियमावली नाही. त्यांच्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.- चंद्रभूषण, उपसंचालक, सीएसई