शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘इस्रो’ खासगी कंपन्यांकडून तयार करून घेणार उपग्रह

By admin | Updated: September 5, 2016 04:15 IST

विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता असे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घ्यायचे

बंगळुरु: विविध उपयोगांसाठी लागणाऱ्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेता असे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घ्यायचे व त्यांचे अंतराळात प्रक्षेपण स्वत: करायचे, असे नवे धोरण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ठरविले आहे. अशा प्रकारे खासगी कंपनीकडून तयार केलेल्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण येत्या मार्चमध्ये केले जाणे अपेक्षित आहे.‘इस्रो’च्या उपग्रह केंद्राचे संचालक एम. अण्णादुराई यांनी सांगितले की, प्रक्षेपणासाठी लागणारे उपग्रह स्वत: तयार करण्यात सध्या ‘इस्रो’चा बराच वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. हवे त्या प्रकारचे उपग्रह खासगी कंपन्यांकडून तयार करून घेतल्याने आम्हाला संशोधन व अधिक सुदूर अंतराळात अवकाश याने सोडण्याच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल.सुरुवातीस ‘इस्रो’ स्वत:च्या देखरेखीखाली असे उपग्रह तयार करून घेईल व अंतिमत: तंत्रज्ञान हस्तांतरण करून देशातील व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वच उपग्रह खासगी क्षेत्राकडून तयार करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.आत्ताही ‘इस्रो’ स्वत: उपग्रह तयार करताना त्यासाठी लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग व यंत्रणा बव्हंशी खासगी कंपन्यांकडूनच घेत असते. अशा देशातील १०० पुरवठादार कंपन्यांकडे ‘इस्रो’न जूनमध्ये, तंत्रज्ञान व आरेखने पुरविली तर संपूर्ण उपग्रह तयार करून देण्यात स्वारस्य आहे का, अशी विचारणा केली होती व त्यांच्याकडून निविदांच्या स्वरूपात देकार मागविले होते. त्यापैकी ४० कंपन्यांनी अशी तयारी दर्शविली असल्याचे अण्णादुराई म्हणाले. सध्याच्या गरजा विचारात घेता भारताला सध्या ‘डीटीएच’ टीव्ही प्रक्षेपण. दूरसंचार सेवा आणि नागरी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘मॅपिंग’ याकरता पुढील पाच ते सात वर्षे दर महिन्याला सरासरी एक उपग्रह अंतराळात सोडावा लागणार आहे. आम्ही इच्छुकांमधून सक्षम भागिदार निवडू, त्यांना कामात तयार करू व त्यांनी केलेल्या कामाचे प्रमाणीकरण करू. उपग्रहांच्या गरजेचा आकडा पाहता बाहेरच्या पुरवठादारांशी अशी भागिदारी सुरु करून ती भक्कम करणे गरजेचे आहे, असेही अण्णादुराई यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>मोठी जागतिक बाजारपेठताज्या अंदाजानुसार लहान आणि लघु उपग्रह तयार करण्याचा सध्याचा जागतिक उद्योग २.२२ अब्ज डॉलरचा आहे. सन २०२०पर्यंत तो ५.३२ अब्ज डॉलरवर पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.सध्या ‘इस्रो’ स्वत:चे उपग्रह सोडण्याखेरीज इतर देशांचे व खासगी संस्थांचे उपग्रहही प्रक्षेपित करते. त्यासाठी लागणारे जे उपग्रह सध्या परदेशांत बनविले जातात त्यांचे कामही भारतीय कंपन्यांना मिळू शकेल.