शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी

By admin | Updated: August 2, 2016 04:37 IST

राज्यसभेतील अद्रमुक सदस्य एम. शशीकला पुष्पा यांची पक्षाध्यक्ष जयललिता यांनी सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली/चेन्नई- राज्यसभेतील अद्रमुक सदस्य एम. शशीकला पुष्पा यांची पक्षाध्यक्ष जयललिता यांनी सोमवारी पक्षातून हकालपट्टी केली. काही दिवसांपूर्वी त्यांची दिल्ली विमानतळावर एका द्रमुख खासदारासोबत हाणामारी झाली होती. या घटनेमुळे पक्षाची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत जयललिता यांनी शशीकला यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांचा राजीनामा फॅक्सने राज्यसभा सचिवालयाकडे पोहोचला असला तरी शहानिशा न झाल्याने तो स्वीकारण्यात आलेला नाही.तथापि, आपल्या हकालपट्टीचा विमानतळावरील घटनेशी संबंध नसल्याचे सांगून शशीकला यांनी राजीनाम्यासाठी दोन महिन्यांपासून आपल्यावर दबाव आणण्यात येत होता, असे राज्यसभेत सांगितले. निवेदन करताना अनेकदा त्यांचा कंठ दाटून आला होता. मला आमच्या नेत्याने मारले, असे सांगताना तर त्या रडवेल्या झाल्या होत्या. मात्र, अण्णा द्रमुकच्या नेत्याचे त्यांनी नाव उच्चारले नाही. शशीकला यांनी पक्षाचे सिद्धांत आणि मूल्यांचे उल्लंघन केले असल्यामुळे त्यांना सर्व पदांवरून हटविण्यासह, सदस्यत्वातूनही मुक्त करण्यात येत असल्याचे जयललिता यांनी म्हटले आहे. >जिवाला धोकासभागृहात निवेदन करताना शशीकला म्हणाल्या की, एका नेत्याने आपल्या श्रीमुखात भडकावली होती. राज्य सरकारकडून आपल्या जिवाला धोका असून, राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, यासाठी आपल्यावर दबाव आणला जात आहे. शशीकला शून्य प्रहरात आपले म्हणणे मांडू इच्छित होत्या. त्यासाठी त्या सभापतींच्या आसनाजवळ गेल्या. त्यानंतर, बोलताना त्यांना अनेकदा रडूच कोसळले.