शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या शुद्धीकरणासाठी संस्कृतला प्रोत्साहन देणे गरजेचे

By admin | Updated: June 29, 2015 00:17 IST

संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला.

बँकॉक : संस्कृत भाषेला चालना दिली पाहिजे. कारण संस्कृत भाषा लोकांच्या मनाचे शुद्धीकरण करते आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाला पवित्र करते, असा दावा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे केला. ६० देशांतील संस्कृत विद्वानांच्या पाच दिवसीय संमेलनाचे उद्घाटन रविवारी त्यांच्या हस्ते झाले.संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात सुषमा स्वराज यांनी संस्कृतला ‘आधुनिक आणि सार्वत्रिक’ भाषा संबोधत याच्या परंपरेची गंगा नदीशी तुलना केली. ६०० हून अधिक संस्कृत विद्वानांची उपस्थिती असलेल्या या संमेलनात सुषमा यांनी आपले संपूर्ण भाषण संस्कृतमध्ये दिले.१६ व्या जागतिक संस्कृत संमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना सुषमा यांनी परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (संस्कृत) असे स्वतंत्र पद तयार करण्याची घोषणा केली.भाषेची ओळख, अनुवाद, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम गुप्तचर सेवा यासारख्या अन्य क्षेत्रांत सॉफ्टवेअर विकसित करण्यात संस्कृत महत्त्वाची भूमिका निभावू शकते, असा मतप्रवाह वैज्ञानिकांत असल्याचे स्वराज म्हणाल्या. जागतिक संस्कृत संमेलनात प्रथमच सुषमा स्वराज यांच्या पातळीचा एखादा केंद्रीय मंत्री सामील झाला. यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराला किती महत्त्व देते याचे संकेत मिळतात. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी दोन जुलै रोजी या संमेलनाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पहिले संस्कृत संमेलन १९७२ मध्ये दिल्लीला झाले होते.यावेळी भारतातून २५० संस्कृत विद्वानांनी संमेलनाला उपस्थिती लावली. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्कृत भारती या संस्थेचे ३० प्रतिनिधी होते. संस्कृत भारतीच्या भूमिकेचेही स्वराज यांनी यावेळी कौतुक केले. (वृत्तसंस्था)शास्त्र-विज्ञानातील अंतर दूर करण्यासाठी प्रयत्न४सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘गोमुखातून उगम पाऊन गंगा सागरला (येथे समुद्राला मिळते) पोहोचल्यानंतरही गंगा नदी पवित्र राहते. तिने उपनद्यांना पवित्र बनविले. याचप्रमाणे ‘संस्कृत’ पवित्र असून अन्य कोणत्याही भाषा तिच्या संपर्कात आल्यानंतर त्या सर्वांना पवित्र बनविले.’ या पार्श्वभमीवर संस्कृतचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असून यामुळे लोकांच्या मनाचे शुद्धीकरण होईल व अशा प्रकारे संपूर्ण जग पवित्र होईल. ४‘संस्कृतच्या ज्ञानाने तापमान वाढ, सभ्यतांमधील संघर्ष, गरिबी, दहशतवाद यासारख्या समकालीन समस्यांवर तोडगा निघू शकतो. आमचा प्रयत्न शास्त्र आणि विज्ञान यांच्या अभ्यासातील अंतर दूर करण्याच्या दिशेने सुरू आहे,’ असे त्या म्हणाल्या.