संजय दत्तच्या फर्लोला कात्री लागणार-
By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST
संजय दत्तच्या फर्लोला कात्री लागणार
संजय दत्तच्या फर्लोला कात्री लागणार-
संजय दत्तच्या फर्लोला कात्री लागणार- अधिकार्यांवरही कारवाई होणारमुंबई- अभिनेता संजय दत्त त्याची फर्लोची मुदत उलटल्यावर दोन दिवसांनी पुण्यातील येरवडा तुरुंगात दाखल झाल्यामुळे त्याची पुढील दहा दिवसांची फर्लोची रजा घटणार आहे, तर ज्या पोलीस अधिकार्यांच्या गलथान कारभारामुळे हे घडले त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे, अश्ी माहिती गृहखात्याच्या सुत्रांनी दिली.अभिनेता संजय फर्लोच्या रजेवर असताना प्रकृतीच्या कारणास्तव १४ दिवसांनी आपली रजा वाढवण्याकरिता अर्ज केला होता. मात्र मुंबई पोलीस आणि तुरुंग प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही रजा मंजूर झाली नाही. परिणामी फर्लोची मुदत उलटून गेल्यावरही संजय दोन दिवस बाहेर होता. याबाबतचा चौकशी अहवाल तयार असून नियमातील तरतुदीनुसार दत्त यांच्या एक दिवसाच्या अतिरिक्त रजेकरिता पाच दिवसांची याप्रमाणे दोन दिवसांकरिता दहा दिवसांची रजा घटणार आहे.गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनीही चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)