शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संघाने भाजपाला दिला घरचा अहेर

By admin | Updated: February 18, 2015 01:25 IST

भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक : किरण बेदी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्हनवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष (भाजप) दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरला नसतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पक्षावर शरसंधान साधले आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याच्या निर्णयावर संघाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्याची भाजपला कशी किंमत मोजावी लागली याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या ताज्या अंकात ‘आकांक्षाओंकी उडान’ आणि ‘वादे, सवाल, केजरीवाल’ या शीर्षकाखाली दोन लेख प्रकाशित झाले आहेत. या लेखांमधून दिल्लीत भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली आहे. अखेर भाजप पराभूत का झाला? बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार करण्याचा निर्णय योग्य होता काय? या पदासाठी हर्षवर्धन अथवा राज्यातील इतर कुठल्या नेत्याची निवड केली असती तर निकालाचे चित्र वेगळे असते काय? आदी प्रश्न यात उपस्थित करण्यात आले आहेत. मनोज वर्मा यांनी लिहिलेल्या लेखात पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी जनतेसमक्ष मांडण्यात अपयशी ठरला की मोदी लाटेवर अवाजवी अवलंबून राहिला, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यात बेदींची उमेदवारी कशी महागात पडली याकडे लक्ष वेधतानाच असे नमूद करण्यात आले की, संघटनेत ऐक्य, नियोजनाचा अभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्हितेश शंकर यांनी लिहिलेल्या दुसऱ्या लेखात भाजपच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे संघ सिद्धांतांची शिदोरी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या समर्पणाशिवाय दुसरे कुठले भांडवल आहे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.च्पक्ष म्हणजे एखाद्या यंत्राप्रमाणे असून ते आपल्या इच्छेनुसार त्याचा कारभार चालवू शकतात, असे संघटना आणि सरकारमधील काही लोकांना वाटू लागले असेल तर या निकालांनी त्यांचा हा भ्रमाचा भोपळा फुटला पाहिजे. च्कारण केवळ पक्ष कार्यकर्त्यांचे समर्पण आणि राष्ट्रवादी सिद्धांताप्रती असलेली वचनबद्धता याच्या बळावरच भाजप आपली मते कायम ठेवू शकला आहे, अशा कठोर शब्दांत या लेखात पक्ष नेतृत्वाची कानउघाडणी करण्यात आली आहे.