शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर

By admin | Updated: June 14, 2015 01:55 IST

ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे.

नवी दिल्ली : ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर झाली आहे. याशिवाय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, औरंगाबादचे पं. नाथ नेरळकर, संगीत रंगभूमीवरील गायक व अभिनेते रामदास कामत आणि सुप्रसिद्ध बासरीवादक रोणु मुजुमदार यांच्यासह ३६ जणांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.बोरकर यांच्यासह संगीततज्ज्ञ एस.आर. जानकीरामन, चित्रपट निर्माते एम.एस. सत्यु आणि शास्त्रीय गायक विजय किचलु यांचीही २०१४च्या फेलोशिपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना ३ लाख रुपये रोख देऊन गौरविण्यात येईल. संगीत अकादमीतर्फे संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. कार्यकारी समितीने बुधवारी हा निर्णय घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)अकादमीचे विविध क्षेत्रांसाठी जाहीर केलेले पुरस्कारसंगीत : अश्विनी भिडे-देशपांडे (गायिका), उस्ताद इक्बाल अहमद खान, नाथ नेरळकर, पंडित नयन घोष, रोणु मुजुमदार (बासरीवादन), सुकन्या रामगोपाल, द्वारम दुर्गा, प्रसाद राव. नृत्यकला : अदयार जनार्दनन् (भरतनाट्यम), उमा डोग्रा (कथ्थक), अमुसनादेवी, वेदान्तम् राधेश्याम (कुचीपुडी), सुधाकर साहु (ओडिसी), अनिता शर्मा, जग्रु महतो, नवतेजसिंग जोहरनाटक : रामदास कामत, अमोद भट, असगर वजाहत, चिदंबरराव जांबे, देवशंकर हलदार, मंजुनाथ भागवत होस्टोटा, अमरदास माणिकपुरीअश्विनी भिडे - देशपांडे : संगीत नाटक अकादमीच्या या राष्ट्रीय पुरस्काराला वैभवशाली परंपरा आहे. आतापर्यंत अनेक नामवंत कलावंतांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या वेळी हा पुरस्कार मला मिळाल्यामुळे ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आल्यासारखे वाटते. रोणू मुजुमदार : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार म्हणजे माझ्या गेल्या ४0 वर्षांच्या संगीतसेवेची पावती आहे. यासाठी मी माझे गुरुवर्य, तसेच माझ्या हितचिंतकांना धन्यवाद देऊ इच्छितो. कारण या सर्वांमुळेच मी आज या स्तरावर येऊन पोहोचलो आहे. संगीत क्षेत्रातला हा मोठा पुरस्कार आहे आणि तो मला मिळाल्याबद्दल मला समाधान आहे. माझे आतापर्यंतचे काम योग्य दिशेने झाले आहे, यावर या पुरस्काराने मोहोर उमटवली आहे.रामदास कामत : संगीत नाटक अकादमीचा हा पुरस्कार मानाचा आहे आणि हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल अतिशय आनंद वाटला. हा सन्मान केवळ माझा नाही; तर हा सन्मान नाट्यसंगीताचा आहे. त्याचबरोबर सुगम संगीताचाही हा गौरव आहे. त्यामुळे मला विशेष आनंद आहे. हा पुरस्कार मिळाला याचा मला अभिमान वाटतो.