संदीप तायडेची ९ वर्षांची सेवा आली होती संपुष्टात बनावट जन्म दाखले प्रकरण : बनावट सही केल्याचे झाले होते उघड
By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST
जळगाव: बनावट जन्म-मृत्यूचे दाखले तयार करून दिल्याप्रकरणी दाखल गुन्ात पोलिसांनी मनपा जन्म-मृत्यू विभागात लिपिक म्हणून काम केलेल्या व नुकतीच पर्यावरण विभागात बदली झालेल्या लिपिक संदीप तायडे यास अटक केली आहे. मात्र संदीपने २०१४ मध्येदेखील बनावट दाखला तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी सहा महिन्यांच्या निलंबनानंतर माफीनामा दिल्याने त्याची ९ वर्षांची सेवा संपुष्टात आणत त्याला मूळ वेतनावर आणण्याची शिक्षा आयुक्तांनी दिली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
संदीप तायडेची ९ वर्षांची सेवा आली होती संपुष्टात बनावट जन्म दाखले प्रकरण : बनावट सही केल्याचे झाले होते उघड
जळगाव: बनावट जन्म-मृत्यूचे दाखले तयार करून दिल्याप्रकरणी दाखल गुन्ात पोलिसांनी मनपा जन्म-मृत्यू विभागात लिपिक म्हणून काम केलेल्या व नुकतीच पर्यावरण विभागात बदली झालेल्या लिपिक संदीप तायडे यास अटक केली आहे. मात्र संदीपने २०१४ मध्येदेखील बनावट दाखला तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यावेळी सहा महिन्यांच्या निलंबनानंतर माफीनामा दिल्याने त्याची ९ वर्षांची सेवा संपुष्टात आणत त्याला मूळ वेतनावर आणण्याची शिक्षा आयुक्तांनी दिली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. संदीप हा २०१४ मध्ये जन्म-मृत्यू विभागातच लिपिक म्हणून कार्यरत असताना त्याने जन्मदाखल्यांवर तत्कालीन आरोग्याधिकार्यांची बनावट सही केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आरोग्याधिकार्यांनी त्याला मनपा आयुक्तांसमोर उभे केले होते. आयुक्तांनी तायडे यास निलंबित केले होते. सहा महिने निलंबनानंतर तायडे याने माफीनामा लिहून देत गुन्हा कबूल केल्याने आयुक्तांनी त्यास ८ वेतनवाढी रद्द करण्याची म्हणजेच ९ वर्षांची सेवा रद्द करीत मूळ वेतनावर सेवेत रूजू करून घेतले होते. दरम्यान या संदर्भात तत्कालीन आरोग्याधिकार्यांनी पोलिसांत तक्रारही दिली होती. मात्र तायडे यास निलंबित केल्याने पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. मात्र तेव्हा दुर्लक्ष झाल्याने तायडे याने पुन्हा तोच गुन्हा करण्याची हिंमत केली. मात्र त्यातही सापडल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने बनावट सा करून असे किती जन्म-मृत्यूचे दाखले दिले आहेत? याचा तपासही पोलिसांना करावा लागणार आहे.मनपा प्रशासनाने सध्या त्यास निलंबित केले आहे.