शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
2
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
3
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
4
अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती
5
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
6
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
7
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला
8
जातनिहाय जनगणना देशासाठी का महत्त्वाची? नेमका कुणाला, किती फायदा? जाणून घेऊया
9
दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिका ठरल्या कार्बन न्युट्रल कॉरिडॉर
10
एनएमएमटीच्या चार बस जळून खाक; घणसोली आगारात आणखी तीन ते चार बसचे नुकसान
11
बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी
12
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
13
नवी मुंबईची बस अंधेरीत जळाली; प्रवाशांची सुखरूप सुटका; शॉर्टसर्किटचा संशय
14
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
15
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
16
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
17
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
18
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
19
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
20
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO

संदीप नाईक यांनी केली मान्सूनपूर्व कामांची पाहणी

By admin | Updated: May 6, 2015 23:43 IST

नवी मंुबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आज शहराचा दौरा करून महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. विशेषत: नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत ही कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

नवी मंुबई : ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आज शहराचा दौरा करून महापालिकेमार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांची पाहणी केली. विशेषत: नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत ही कामे मुदतीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
दिघा येथील विष्णुनगर-सुभाषनगर येथून या दौर्‍याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ऐरोली सेक्टर-३ येथील मोठ्या नाल्यांची पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा पाढा आमदार नाईक यांच्यासमोर वाचला. सेक्टर-१५ येथील जॉगिंग ट्रॅकची पाहणी करताना त्यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. घणसोली परिसरातील घरोंदा-सिम्प्लेक्स वसाहतीला जोडणार्‍या मुख्य नाल्याची पाहणी करताना एमआयडीसीच्या दूषित पाण्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची बाब रहिवाशांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन नाईक यांनी रहिवाशांना दिले. कोपरखैरणे सेक्टर-२९ येथील मुख्य नाल्यातील गाळ उपसण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना केल्या. या पाहणी दौर्‍यात महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, स्वच्छता अधिकारी, पक्षाचे आजी-माजी नगरसेवक व रहिवाशी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
................
फोटो: 0६ संदीप नाईक