शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्याच्या शर्यतीत संदीपने मोडला राष्ट्रीय विक्रम

By admin | Updated: February 18, 2017 21:51 IST

हरियाणाच्या संदीप कुमार याने शनिवारी ५०० किमी पायी चालण्याचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि सुवर्ण जिंकले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ -  हरियाणाच्या संदीप कुमार याने शनिवारी ५०० किमी पायी चालण्याचा स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आणि सुवर्ण जिंकले. त्याच्यासह दोन अन्य खेळाडूंना पुढील महिन्यात होणाºया लंडन विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. संदीपने ३ तास ५५ मिनिटे ५९.०५ सेकंद वेळेची नोंद केली. याआधी त्याचा राष्ट्रीय विक्रम ३ तास ५६ मिनिटे २२ सेकंदांचा होता. मे २०१४ मध्ये चीनच्या तायकांग येथे विश्व रेस वॉकिंग कपमध्ये त्याने ही वेळ नोंदविली होती. सेनादलाचा जितेंद्रसिंग याने ४ तास २ मिनिटे ११ सेकंदांसह दुसरे आणि चंदनसिंग याने ४ तास ४ मिनिटे १८.४१ सेकंदांसह तिसरे स्थान घेतले. जितेंदर आणि चंद हे देखील चार २ ते १३ आॅगस्ट या कालावधीत होणाºया विश्व चॅम्पिनशिपमध्ये सहभागी होणार आहेत. विश्व चॅम्पियनशिपमध्ये पुरुष ५० किमीपायी चालण्याची पात्रता वेळ चार तास सहा मिनिटे ठेवण्यात आली आहे. २०१४ च्या आशियाडमध्ये संदीप चौथ्या स्थानावर होता. पुरुषांच्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवीर 
सेनादलाचा केटी इरफान याने बाजी मारली. त्याने १ तास २२ मिनिटे ४३.४८ सेकंद वेळ नोंदविली तर महिला गटात अव्वल आलेली ओएनजीसीची प्रियंका हिने १ तास ३७ मिनिटे ५८.३२ सेकंद वेळेची नोंद केली. शांतीकुमारीला रौप्य आणि राणी यादवला कांस्य मिळाले. या दोघीही रेल्वेच्या खेळाडू आहेत. महिला गटात कुणीही खेळाडू विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठू शकल्या नाहीत.
 
‘‘आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडल्याचा आनंद आहे. लंडन विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरल्याने माझा आत्मविश्वास वाढेल. भविष्यात सुधारणा करीत आणखी चांगल्या वेळेची नोंद करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’- संदीप कुमार.
 
(वृत्तसंस्था)