शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

संदीप दास यांना ग्रॅमी पुरस्कार

By admin | Updated: February 14, 2017 00:40 IST

सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात समृद्ध असलेल्या देशातून मी आलो आहे. माझ्या देशाच्या रक्तातच संगीत वाहत असून मला

लॉस एंजिलिस : सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रात समृद्ध असलेल्या देशातून मी आलो आहे. माझ्या देशाच्या रक्तातच संगीत वाहत असून मला तेथून खूप शुभेच्छा मिळाल्या आहेत, अशी भावना जागतिक संगीत गटामध्ये प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार पटकावणारे तबलापटू संदीप दास यांनी व्यक्त केली. यो-यो मा यांच्या ‘सिंग मी होम’ कार्यक्रमाचा भाग असलेले भारतीय तबलापटू संदीप दास रविवारी रात्री प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलत होते. जागतिक संगीत गटात अनुष्का शंकर यांच्या ‘लँड आॅफ गोल्ड’चाही समावेश होता. परंतु त्यांना पुरस्कारापासून वंचित राहावे लागण्याची ही सहावी वेळ होती. अनुष्का शंकर यांच्या ‘लँड आॅफ गोल्ड’चा विषय जागतिक पातळीवरील निर्वासितांच्या प्रश्नाशी संबंधित आहे. अनुष्का शंकर या प्रसिद्ध सितारवादक पंडित रवि शंकर यांच्या कन्या असून त्यांना वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. परंतु त्यांना अजूनही या सन्मानाने हुलकावणी दिली आहे.बियोन्सने चाहत्यांना आपल्या अत्यंत प्रभावी कामगिरीने दीपवून टाकले असले तरी २०१७ वर्षाच्या महत्वाच्या ग्रॅमी अवॉर्डसची मानकरी ठरली ती ब्रिटिश गायक अ‍ॅडले. ‘अल्बम आॅफ द ईयर’, ‘रेकॉर्ड आॅफ द ईयर’ आणि ‘साँग आॅफ द ईयर’सह पाचही वर्गांत अ‍ॅडले या पुरस्कारांची मानकरी ठरली. उत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट पॉप व्होकल अल्बमसह पाचही वर्गांसाठी अ‍ॅडलेचे नामांकन झाले होते. या पुरस्कारांच्या स्पर्धेत बियोन्स ‘लिमोनेड’साठी नऊ नामांकनासह खूप आघाडीवर होती परंतु तिला केवळ दोनच पुरस्कारावर समाधान मानावे लागले. ग्रॅमीमध्ये १९९९ पासून प्रथमच बेस्ट न्यू आर्टिस्टचा पुरस्कार चान्स द रॅपर (चॅन्सेलर जोनाथन बेनेट) या २३ वर्षांच्या कृष्णवर्णीयाने पटकावला. ‘कलरिंग बुक’ या त्याच्या तिसऱ्या मिक्सटेपसाठी त्याने हा पुरस्कार मिळवला. (वृत्तसंस्था)पुरस्काराचे दोन तुकडे केले अ‍ॅडलेने अॅडलेने तिला अल्बम आॅफ द ईयरसाठी मिळालेल्या गॅ्रमी पुरस्काराचे व्यासपीठावरच दोन तुकडे केले व हा पुरस्कार खऱ्या अर्थाने बियोन्सचा असल्याचे म्हटले.बियोन्सचा ‘लिमोनेड’ हा या पुरस्काराचा मानकरी ठरायला हवा होता, अशा शब्दांत अ‍ॅडलेने आपल्या भावना पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात व्यक्त केल्या.