शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

‘सॅमसंग नोट-२’ने घेतला पेट

By admin | Updated: September 24, 2016 06:13 IST

इंडिगो विमानात ‘सॅमसंग नोट-२’ स्मार्टफोन आगीने पेटल्याने विमानातील १७५ प्रवाशांत एकच घबराट निर्माण झाली.

नवी दिल्ली : चेन्नई विमानतळावर उतरण्याच्या बेतात असलेल्या इंडिगो विमानात ‘सॅमसंग नोट-२’ स्मार्टफोन आगीने पेटल्याने विमानातील १७५ प्रवाशांत एकच घबराट निर्माण झाली. सिंगापूर-चेन्नई या हवाईमार्गावरील इंडिगोच्या (६-ई-०५४) विमानात शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. चालक पथकाने शिताफीने धूर निघत असलेल्या जागी धाव घेत अग्निरोधक उपकरणाच्या साह्याने आग विझविली. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. सुदैवाने विमान आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचले नाही.दोन आठवड्यांपूर्वी सॅमसंग नोट-७ या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या परदेशांतील घटनांची दखल घेत विमानात हा फोन नेण्यास नागरी उड्डयन महासंचानालयाने (डीजीसीए) बंदी घातली आहे. अवघ्या १५ दिवसांत सॅमसंग स्मार्टफोनच्या बाबतीत घडलेल्या या घटनांमुळे सॅमसंग कंपनी अडचणीत आली आहे. विमानात सॅमसंगच्या स्मार्टफोनने पेट घेण्याची भारतातील ही पहिलीच घटना असली तरी सॅमसंग कंपनीकडून याबाबत प्रतिक्रिया मिळालेली नाही.विमानात प्रवासी आसनाच्या वर प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत ठेवण्यात आलेल्या बॅगमध्ये हा फोन होता. सिंगापूरहून निघालेले इंडिगोचे हे विमान चेन्नई विमानतळावर उतरण्याच्या तयारी असताना विमानातील काही प्रवाशांना धुराचा वास येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच विमानचालक पथकाला हा प्रकार कळवला. विमानचालक पथकाने शिताफीने विमानातील त्या आसनाकडे (सीट-२३-सी) धाव घेत अग्निशमन उपकरणाच्या साह्याने बॅग विझविली. दरम्यान, विमानातील चालक पथकाने वैमानिकाला हा प्रकार कळविला. वैमानिकाने तातडीने या प्रकाराबाबत हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला संदेश देत सतर्क केले.>डीजीसीए पुन्हा जारी करणार नव्याने निर्देशइंडिगो या विमानसेवा कंपनीने सांगितले की, विमान सहीसलामत उतरविण्यात आले. तसेच सर्व प्रवासी सुखरूप आहेत. आता सॅमसंगच्या या मोबाईलची संबंधित विभागाकडून तपासणी केली जाईल. तथापि, या घटनेच्या पार्श्वभूमीवर डीजीसीए सॅमसंगच्या या मोबाईलबाबत नव्याने सल्लात्मक निर्देश जारी करील. डीजीसीएने विमान प्रवाशांना यापूर्वीच विमानात असताना सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ मोबाईल फोन बंद करण्याचा सल्ला दिलेला आहे.>सामान ठेवण्याच्या कप्प्यातील बॅगेत होता हा फोन...विमान आकाशात असताना हा प्रकार घडल्याने प्रवाशांत घबराट पसरली होती. त्यामुळे विमानचालक पथकाने सर्वतोपरी खबरदारी घेत स्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॅगेतील ‘सॅमसंग नोट-२’मधून धूर निघत होता. अग्निरोधक उपकरणाचा वापर करून धुमसणारा धूर विझविला. नंतर हा स्मार्टफोन विमानातील प्रसाधनगृहातील पाण्याच्या डब्यात ठेवला.विमानचालक पथकाने नेमका धूर कोठून निघत आहे, याचा शोध घेतला. तेव्हा ‘सीट-२३-सी’वरील ओव्हरहेड बिनमधून (आसनावरील प्रवासी सामान ठेवण्याचा कप्पा) धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.