शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समाजवादी पक्षाचा नेता राम मंदिर निर्माणासाठी देणार 15 कोटी

By admin | Updated: May 15, 2017 12:24 IST

अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी समाजवादी पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदारानं 15 कोटी देण्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमतउत्तर प्रदेश, दि. 15 - अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी समाजवादी पक्षाच्या विधान परिषदेच्या आमदारानं 15 कोटी देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे नेते बुक्कल नवाब यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी 15 कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. बुक्कल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. सरकारकडून जेव्हा माझ्या जमिनीचा मोबदला मिळेल, त्यावेळी त्यातील 15 कोटी रुपये हे अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी मी दान करेन, असंही बुक्कल यांनी सांगितलं आहे. तसेच राम मंदिर निर्माणाला त्यांनी समर्थनही दिलं आहे. नवाब म्हणाले, भगवान रामाचं मंदिर कोणत्याही परिस्थितीत अयोध्येमध्ये बनले पाहिजे. भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला होता. त्यामुळेच त्यांचं मंदिर अयोध्येत बनवलं पाहिजे. नवाब यांनी काही दिवसांपूर्वीच राम मंदिर बनल्यानंतर मूर्तीवरील मुकुट देणार असल्याचे जाहीर केलं होतं. तसेच 10 लाख रुपयेही देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 10 लाख रुपये आणि मुकुट यात 15 कोटी रुपयांचा समावेश नसेल, 15 कोटी रुपये वेगळे देणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. बुक्कल म्हणाले, मला सरकारकडून अजून 30 कोटी रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. माझ्या जमिनीचा वापर सरकारने गोमती रिव्हरफ्रंटसाठी केला आहे. मात्र सरकारनं अद्यापही त्याचा मोबदला मला दिला नाही. ज्यावेळी सरकार माझ्या जमिनीचा मोबदला देईल, त्यावेळी मी त्यातील 50 टक्के रक्कम राम मंदिराच्या निर्माणासाठी दान करेल, असंही ते म्हणाले आहेत.