शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सलाहुदीनची भारतात परतण्याची इच्छा

By admin | Updated: July 6, 2015 01:06 IST

बंदी असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सईद सलाहुद्दीन याला अजूनही भारतात परतण्याची इच्छा आहे, असे रॉ संघटनेचे माजी प्रमुख ए.एस. दुलात यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : बंदी असणाऱ्या हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा नेता सईद सलाहुद्दीन याला अजूनही भारतात परतण्याची इच्छा आहे, असे रॉ संघटनेचे माजी प्रमुख ए.एस. दुलात यांनी म्हटले आहे. सईद सलाहुद्दीन याच्या परतण्याचा कार्यक्रम ठरविण्यात सरकारने फार वेळ घेतला, असे दुलात यांना वाटते. २००१ पर्यंत सईद भारतात परतण्यास तयार होता. ही त्याची इच्छा मी अनेक वेळा सांगितली होती. माझ्यानंतरचे रॉचे प्रमुख विक्रम सूद यांना या प्रस्तावात रस नसावा. पंतप्रधान कार्यालयातून मी काश्मीर प्रश्न हाताळत असल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांनीही यात पडण्याची गरज नाही, असा निर्णय घेतला असावा, असे दुलात यांनी ‘काश्मीर : द वाजपेयी इअर्स’ या पुस्तकात म्हटले आहे. रॉतून २००० साली निवृत्त झाल्यानंतर दुलात वाजपेयी सरकारच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे काश्मीरवरील विशेष सल्लागार होते.  सलाहुद्दीनने माजी मुख्यमंत्री मीर कासीम यांच्याशी १९९० च्या मध्यात संपर्क साधला होता. मला विसरू नका, असे त्याने कासीम यांना सांगितले होते. तुम्ही वाटाघाटी करीत असाल तर मला विसरू नका, असे सलाहुद्दीन म्हणाला होता, असे दुलात यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अजूनही मला संदेश मिळतात. २० वर्षांनंतरही आपले काही लोक पाकिस्तानात अडकले आहेत, असे दुलात यांचे म्हणणे आहे.--------------> दुलात यांनी हा प्रसंग वर्णन करताना असे म्हटले आहे की, तत्कालीन श्रीनगरमधील आय.बी. प्रमुख के.एम. सिंग यांना सलाहुद्दीनचा फोन आला होता. त्याच्या मुलाला भारतात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश हवा होता. ते काम झाले आणि सलाहुद्दीनने आभार मानण्यासाठी पुन्हा सिंग यांना फोन केला. > त्याच्या या बोलण्यातून योग्य तो बोध घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. अगदी कमी वेळेत घ्यायच्या या निर्णयसाठी वेळ वाया घालवला गेला. निर्णय झालाच नाही.