शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सलमानचे प्रयत्न अपुरे, मलायका-अरबाज खान होणार वेगळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 11:39 IST

गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणारी चर्चा अखेर खरी ठरण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १३ - गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान आणि 'छैंया छैंया' गर्ल मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात सुरू असणारी चर्चा अखेर खरी ठरण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मलायका लवकरच मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत सलमान खानने अरबाज आणि मलायकामधील दुरावा कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरेच ठरले असल्याचे समजते आहे. मलायकाचा घटस्फोटाचा निर्णय अंतिम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
मागील तीन महिन्यांपासून मलायका अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती खारमधील भाड्याच्या घरात मुलगा अरहानसोबत राहत आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते; मात्र मलायका तिच्याकडे राहत नाही. अमृताने वाढदिवसानिमित्त दुबईत दिलेल्या पार्टीलाही मलायका गेली नव्हती. या पार्टीला अरबाज उपस्थित होता. नणंद अर्पिताच्या डोहाळे जेवणालाही मलायका गैरहजर राहिली होती.
 
५ वर्ष एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका व अरबाज लग्नाच्या बंधनात अडकले होते. १८ वर्षांमध्ये त्या दोघांमध्ये खटके उडाल्याचे ऐकिवात नव्हते. अलीकडे ते दोघे पॉवर कपल या रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत होते; मात्र जेमतेम तीन भागच ते एकत्र होते. शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत असत. त्या वेळी या दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा होती. 
 
दरम्यान, अरबाजला ती परत येईल अशी अपेक्षा होती पण तसे घडताना दिसत नाही. सलीम खान आणि सलमा खान यांनीही दोघात तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते पण त्यांचा सल्लाही मलायकाने मानलेला नाही. त्यामुळे लवकरच त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत बातमी वाचायला मिळू शकते.