शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सलमानला नक्कीच जामीन मिळेल! वकिलांना खात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:34 IST

सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत.

जोधपूर - सलमान गुरुवारपासून येथील तुरुंगात असला, तरी त्याच्या अल्विरा व अर्पिता या दोन्ही बहिणींचा मुक्काम अद्याप जोधपूरमध्येच आहे. त्या जामीन अर्जाचा उद्या काय निकाल लागतो, हे पाहण्यासाठी थांबल्या आहेत. तो निकाल आज लागेल, अशी त्यांची अपेक्षा होती. सलमानला निश्चितच जामीन मिळेल, असे त्याच्या वकिलांना वाटत आहे.अभिनेत्री प्रीती झिंटा हिने आज सकाळी तुरुंगात सलमानची भेट घेतली. सलमानला उद्या जामीन मिळेल व तो नंतर मुंबईला येईल, या अंदाजामुळे बॉलिवूडमधील कोणीही त्याला भेटण्यासाठी जोधपूरला आले नसल्याचे समजते. प्रीती आधीपासून राजस्थानात असल्याने ती भेटायला गेली, असे समजते. सलमानला जामीन मिळाल्यानंतर तो मुंबईत आला की मात्र बॉलिवूडमधील मंडळी त्याला भेटायला त्याच्या घरी जातील, असे सूत्रांनी सांगितले. हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणालाही त्याला आताही भेटण्यात अडचण वाटत नाही. पण उद्या त्याची सुटका होण्याची शक्यता असल्याने कोणी आज जोधपूरला गेले नाही, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)सलमानच्या वकिलाला धमक्याजोधपूर सत्र न्यायालयासमोर सलमान खानची बाजू मांडणारे अ‍ॅड. महेश बोरा यांनी आपणास आज धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सलमानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीला मी उपस्थित राहू नये, यासाठी मला धमक्या देण्यात आल्या. मला एसएमएस व इंटरनेट कॉलद्वारे धमकावण्यात आल्याचे अ‍ॅड बोरा यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.वन्यजीवांच्या रक्षणासाठी बिष्णाई टायगर्स फोर्ससंपूर्णत  शाकाहारी असणाऱ्या समाजाने वन्यजीव संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाची म्हणजेच जनावरांच्या शिकारीची आतापर्यंत ४00 हून अधिक प्रकरणे उघडकीस आणली असून, कित्येकांना तुरुंगातही पाठविले आहे. शिकार रोखणे व ती झाल्यास तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करणे, यांत त्यांची बिष्णोई टायगर्स फोर्स ही संघटना सक्रिय असते. त्यामुळेच सलमान खानला काल शिक्षा होताच, बिष्णोई समाजाने न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला होता.न्यायालयात प्रकरण गेल्यावर साक्षीदार तिथे वेळेत पोहोचतील, व्यवस्थित साक्ष देतील, ते फुटणार नाहीत आणि पुराव्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी ही संघटना घेते, असे फोर्सचे अध्यक्ष रामपाल भंवड यांनी सांगितले. वन्यजीवांचे संरक्षण करताना, बिष्णोई समाजाचे २0 हून अधिक लोक मरण पावले असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Salman Khanसलमान खानBlackbuck poaching caseकाळवीट शिकार प्रकरणCourtन्यायालय