शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

‘कार्पेट एरिया’नुसारच घरांची विक्री

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

घरांच्या खरेदी व्यवहारात ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीस आळा घालून बिल्डरांच्या मनमानी कारभारास लगाम घालण्यासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा निर्माण करण्याच्या विधेयकास

नवी दिल्ली : घरांच्या खरेदी व्यवहारात ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीस आळा घालून बिल्डरांच्या मनमानी कारभारास लगाम घालण्यासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणा निर्माण करण्याच्या विधेयकास संसदेची मंजुरी मिळाल्याने गेली तीन वर्षे प्रलंबित असलेला हा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. ‘रिअल इस्टेट (रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट) बिल’ राज्यसभेने गेल्या गुरुवारी मंजूर केले होते. लोकसभेनेही त्यास मंगळवारी संमती दिली.संसदेच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठविले जाईल व त्यानंतर त्यास कायद्याचे स्वरूप येईल. हा कायदा दोन टप्प्यात लागू करण्याचा सरकारचा इरादा आहे. कायद्यातील नियामक प्राधिकरण नेमण्यासंबंधीच्या तरतुदी आधी लागू केल्या जातील. सर्व राज्यांमध्ये वर्षभरात तशी प्राधिकरणे स्थापन झाल्यावर इतर तरतुदी लागू केल्या जातील.महाराष्ट्र सरकारनेही याच धर्तीवरचा कायदा केला होता. त्यात ग्राहकहिताच्या अशा काही आणखी तरतुदी होत्या. परंतु आता केंद्राने त्याच विषयावर कायदा केल्याने राज्याच्या कायद्याऐवजी केंद्रीय कायदा लागू होईल. राज्याला हव्या असतील तर नंतर दुरुस्त्या करून अतिरिक्त तरतुदी समाविष्ट करता येतील.(लोकमत न्यूज नेटवर्क)कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी...- प्रत्येक राज्यात नियामक प्राधिकरण व अपिली प्राधिकरण.- प्राधिकरणाकडे प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी सक्तीची.- सर्व मंजुऱ्या मिळाल्याखेरीज गृहनिर्माण प्रकल्पांची जाहिरात नाही.- सर्व घरांची विक्री फक्त ‘कार्पेट एरिया’नुसारच. ‘बिल्ट-अप’, ‘सुपर बिल्ट-अप’चा हिशेब नाही.- प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहकांकडून घेतलेली ७० टक्के रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवण्याचे बिल्डरवर बंधन. हे पैसे अन्यत्र वापरण्यास मनाई.- बिल्डरने घरांचा ताबा देण्यास किंवा ग्राहकाने ठरलेली रक्कम देण्यास विलंब केल्यास दोघांनाही एकाच दराने व्याज द्यावे लागेल.