शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्ेतकरी कर्जमाफीची मागणी कायम

By admin | Updated: March 23, 2017 17:19 IST

शेतकरी कर्जमाफीची मागणी कायम

शेतकरी कर्जमाफीची मागणी कायम
विधानपरिषद ठप्प : तहकुबीचा सलग दहावा दिवस
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दहावा दिवससुद्धा कोणत्याही कामकाजाशिवाय वाया गेला. अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून आधी सैनिक पत्नींच्या अवमान प्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाची मागणी आणि आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दयावरुन विधान परिषद ठप्प आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावापासून थेट अर्थसंकल्प मांडण्यापर्यंत सर्व महत्वाचे कामकाज गदारोळ आणि घोषणाबाजीत उरकण्यात येत आहेत.
बुधवारी विधानपरिषदेच्या नियमित कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. शनिवारी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफी होईल अशी शेतक-यांना आशा होती. मात्र, सरकारने कर्जमाफीबाबत चकार शब्द काढला नाही. कर्जमाफी नाही की कर्जावरील व्याजमाफ नाही. केंद्रातील भाजपा नेत्यांनी वारंवार कर्जमाफी देणार नसल्याचे सांगितले असतानाही राज्य सरकार मात्र केंद्राकडून कर्जमाफी आणू असा दावा करत राहिले. एकमेकांकडे बोट दाखवत केवळ फसवणूकीचं काम राज्य सरकारने केल्याचा आरोप मुंडे यांनी केला. शिवाय, विधानसभेत कर्जमाफीची मागणी करणा-या १९ आमदारांना निलंबित करुन सरकारनं लोकशाहीची हत्या केली आहे. या निलंबनामुळे सरकारचे शेतकरीविरोधी धोरण उघड झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत कर्जमाफी घोषित होणार नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी मुंडे यांच्या मागणीला पाठिंबा देत काँग्रेसचीदेखिल हीच भूमिका असल्याचे सांगितले.
यावर, विरोधक जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज होऊ देत नसल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केला. तेच तेच मुद्दे मांडून विरोधक गदारोळ करत आहे. सलग दहा दिवस सभागृहाचे कामकाज रोखण्यात आले आहे. हा सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे कार्यक्रमपत्रिकेवरील सर्व कामकाज आज पार पाडण्यात यावे, अशी मागणी बापट यांनी केली. बापट यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभापतींसमारील मोकळ्या जागेत जमा होत कर्जमाफीसाठी घोषणाबाजीला सुरुवात केली. या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)