ऑनलाइन लोकमत
मीरत (उत्तर प्रदेश), दि. २१ - रस्त्यावरच्या टग्यांपासून वडिलांना वाचवण्यासाठी एका तरुण मुलीने पाच जणांशी रस्त्यावर लढा देत आधुनिक झाशीच्या राणीचे दर्शन घडवले आहे. या मुलीचं हे साहस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून हा प्रकार घडला त्यावेळी त्या परीसरात असलेल्या एका पत्रकाराने काढलेले फोटोही सोशल मीडियावर फिरत आहेत.
ही मुलगी वडिलांसोबत मोटरसायकलवरून जात होती. त्यावेळी त्यांच्या बाईकचा एका कारला किंचित धक्का लागला. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या पाच टग्यांनी खाली उतरून तिच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर केवळ भगे असून वडिलांची हालत न बघवलेल्या या मुलीने शेवटी या टग्यांशी मारामारी करत वडिलांचा मार वाचवला.