शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

‘लष्कर’च्या तळाची जबाबदार सज्जादकडे

By admin | Updated: August 28, 2015 23:51 IST

बारामुल्ला जिल्ह्णातील रफियाबादमध्ये बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर भारतीय सुरक्षा दलाच्या जिवंत हाती लागलेला आणखी एक पाकिस्तानी अतिरेकी सज्जाद

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्णातील रफियाबादमध्ये बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर भारतीय सुरक्षा दलाच्या जिवंत हाती लागलेला आणखी एक पाकिस्तानी अतिरेकी सज्जाद अहमद याच्यावर ‘लष्कर-ए-तोयबा’ने एक विशेष कामगिरी सोपवली होती. रफियाबादेत ‘लष्कर-ए-तोयबा’चा एक तळ स्थापन करण्याची जबाबदारी त्याला देण्यात आली होती. याशिवाय स्थानिक अतिरेकी कय्युम नज्जर याचा प्रभाव कमी करण्याचे कामही त्याला सोपवण्यात आले होते.कय्युम नज्जर याने हिज्बुल मुजाहिदीनपासून तुटून आपली वेगळी अतिरेकी संघटना बनवली होती. नज्जरच्या संघटनेमुळे रफियाबादमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून कमी झाला होता. तो वाढविण्यासाठी सज्जाद अहमदला पाठवण्यात आले होते. सज्जद हा २०१२ मध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’त सामील झाला होता. यापूर्वी पाकव्याप्त काश्मिरातून काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचे दोन प्रयत्न त्याने केले होते; मात्र मोठ्या प्रमाणात तैनात भारतीय जवानांमुळे तो यात अपयशी ठरला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो बलूच आहे आणि तो नैऋत्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरगड येथील रहिवासी आहे. बारामुल्ला जिल्ह्णातील रफियाबादमध्ये नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्रभर चाललेल्या चकमकीनंतर लष्कराने सज्जाद अहमदला अटक केली होती.२२ वर्षांचा पाकी अतिरेकी सज्जाद अहमदला तीन प्रकारणे अतिरेकी प्रशिक्षण मिळाले आहे. त्यात ए आम, दौरा ए खास आणि दौरा ए सूफा याचा समावेश आहे. दौरा ए आममध्ये लहान शस्त्रास्त्रे, ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण दिले जाते.दौरा ए खास तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण आहे. यात रायफल, रॉकेट लाँचर, स्फोटक उपकरणे बनवणे आणि एलएमजी चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तिसऱ्या आणि शेवटच्या दौरा ए सूफामध्ये अतिरेकी कारवायांसाठी युवकांना प्रेरित करण्याचे काम सोपवले जाते. पाच दिवसांची कोठडीपाकिस्तानी अतिरेकी सज्जाद अहमद याची श्रीनगर येथील एका न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. सज्जादला शुक्रवारी सोपोरच्या एका न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले.त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी बजावली.