शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सहका-यांनीच मुख्य न्यायाधीशांना दिली धमकी

By admin | Updated: May 11, 2015 02:53 IST

मद्रास उच्च न्यायालयातील वादग्रस्त न्यायाधीश सी.एस. करनन यांनी मुख्य न्यायाधीश संजय कौल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देत विधी वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

सहकाऱ्यांनीच मुख्य न्यायाधीशांना दिली धमकी; मद्रास हायकोर्टचेन्नई : मद्रास उच्च न्यायालयातील वादग्रस्त न्यायाधीश सी.एस. करनन यांनी मुख्य न्यायाधीश संजय कौल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देत विधी वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.विशेष म्हणजे न्या. करनन यांनी अनूसूचित जाती- जमाती अत्याचार निवारण कायद्यानुसारही (अ‍ॅट्रॉसिटी) खटला दाखल करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे जाण्याची धमकी दिल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. मुख्य न्यायाधीशांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या मुलकी न्यायाधीशांच्या निवडीबाबत काही त्रुटी आढळून आल्या असून मी स्वत:हून दखल घेत त्यांचा प्रशासकीय आदेश रोखत आहे, असे न्या. करनन यांनी १६ एप्रिल रोजी न्या. कौल यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. त्यांनी ३० एप्रिल रोजी आणखी एक विनास्वाक्षरी असलेले पत्र मुख्य न्यायाधीशांना पाठवत अवमानना खटला दाखल करण्याचा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा आधार घेणार असल्याचा इशारा दिला. मद्रास उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी आता न्या. करनन यांनी दिलेला आदेश रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ त्यावर सुनावणी करेल. (वृत्तसंस्था)'दलित असल्यामुळे अवमानाचा आरोप४न्या. करनन यांनी यापूर्वी नोव्हेंबर २०११ मध्ये मी दलित असल्यामुळे सहकारी न्यायाधीश लक्ष्य बनवित असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. दलित न्यायाधीश स्वत:च्या सन्मानासाठी समोर येतात तेव्हा त्यांना लक्ष्य बनवून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविला जातो, या त्यांच्या विधानावर त्याकाळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांनी गेल्यावर्षी जानेवारीमध्ये न्यायाधीशांच्या निवडीबाबत उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमवरही टीका केली होती.