मोदी सरकारकडून भगवे आक्रमण- करात यांचा आरोप माकपची परिषद : हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्याचा प्रयत्न
By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST
अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉइंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे.
मोदी सरकारकडून भगवे आक्रमण- करात यांचा आरोप माकपची परिषद : हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्याचा प्रयत्न
अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉइंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे.माकपच्या २१ व्या राज्य परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. मोदी सरकारने संसदेला बाजूला सारत अनेक विधेयकांवर वटहुकूम आणला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या संरक्षण कराराचा आराखडा जनतेपासून दडवून ठेवण्यात आला आहे. अल्पसंख्यकांवरील हल्ले चिंताजनक असून संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असहिष्णुतेला खतपाणी घातले जात आहे. (वृत्तसंस्था)---------------------- सरकारच्या धोरणांवर संघाचा प्रभावसरकारच्या महत्त्वपूर्ण धोरणांवर रा.स्व. संघाचा प्रभाव दिसून येतो. हे सरकार म्हणजे भाजप आणि रा.स्व. संघाचा संयुक्त उद्योग आहे. या दोहोंमध्ये समन्वयासाठी समिती स्थापन झाल्याचे पाहता ही बाब अगदीच स्पष्ट झाली आहे. संघाकडून भाजपलाच नव्हे, तर सरकारलाही मार्गदर्शन केले जात आहे, असेही करात म्हणाले. मोदी सरकारची गेल्या नऊ महिन्यांतील कारकीर्द पाहता उजव्या संघटनांचे आक्रमण सुरू असल्याचे दिसून येते. उजव्या संघटनांचे हे आक्रमण दोन महत्त्वाच्या घटकांसाठी आहे. कॉपार्ेरेट जगतातील बडे उद्योगसमूह आणि दुसरे रा.स्व. संघाच्या नेतृत्वातील हिंदुत्वासाठी. कॉपार्ेरेट क्षेत्राकडून मुक्त धोरणांचा रेटा आक्रमकपणे लावला जात आहे. रा.स्व. संघाकडून जातीयवादाचा अजेंडा राबविला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.