शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी अ‍ॅक्शन मोडमध्ये; रस्ते अपघात टाळण्यासाठी नवा नियम जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 20:24 IST

रस्ते अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाचा नवा नियम

नवी दिल्ली: देशात दरवर्षी हजारो नागरिकांचा रस्ते अपघातात जीव जातो. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी मोदी सरकारनं एक नवा नियम जारी केला आहे. हा नियम सुरक्षा ऑडिटशी संबंधित आहे. रस्ते दुर्घटनांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं हे पाऊल टाकलं आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वीच रस्ते सुरक्षा ऑडिटची घोषणा केली. रस्ते तयार करताना सर्व टप्प्यांमध्ये रोड सेफ्टीच्या उपायांवर पुरेसं लक्ष दिलं जात नसल्याचं त्यावेळी गडकरी म्हणाले होते. त्यामुळेच आता रस्ते निर्मितीच्या सर्वच टप्प्यांमध्ये अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा ऑडिट अनिवार्य असेल.

सुरक्षा ऑडिट म्हणजे काय?कोणत्याही ग्रीनफिल्ड किंवा ब्राऊनफिल्ड रस्ते योजनेचं काम सुरू करण्यापूर्वी त्या रस्त्याचं सुरक्षा ऑडिट केलं जातं. या परिस्थितीत पूर्ण क्षमतेनं रस्त्यावर वाहनं चालल्यास अपघातांची शक्यता किती याची पडताळणी ऑडिटच्या माध्यमातून केली जाते. सुरक्षा ऑडिट केल्यानं रस्ते अधिक सुरक्षित होतील. जोपर्यंत रस्त्याचं सुरक्षा ऑडिट होत नाही, तोपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार नाही.

सुरक्षा ऑडिटचे निकष कोणते?सुरक्षा ऑडिट करताना तज्ज्ञ मंडळी सुरक्षेचे उपाय तपासून पाहतील. फुटओव्हर ब्रिज, अंडरपास, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील वाहनांचा वेग, इंटरचेंज, रेल्वे क्रॉसिंग, बाजार आणि शाळांजवळ असलेले साईन बोर्ड, सतर्कतेसाठी लावण्यात आलेले साईन बोर्ड, तीव्र वळणांची आणि इतर धोक्यांची माहिती देण्यासाठी लावलेले साईन बोर्ड या गोष्टींचा तज्ज्ञांकडून विचार करण्यात येईल. सुरक्षेचे निकष पूर्ण झाले नसल्यास त्यांच्या लोकार्पणास उशीर होईल. रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदारानं बांधकामासाठी निकृष्ट साहित्याचा वापर केला नाही ना, याचीही पडताळणी तज्ज्ञांकडून केली जाईल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरी