शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सईद १ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

By admin | Updated: February 24, 2015 23:27 IST

जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजपच्या युती सरकारची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहंमद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील पीडीपी-भाजपच्या युती सरकारची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. पीडीपीचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहंमद सईद १ मार्च रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. कलम ३७० आणि सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्यासह (अफस्पा) सर्व वादग्रस्त मुद्यांवरील मतभेद निकाली निघाले असून युती सरकारच्या स्थापनेला अंतिम आकार दिला जात आहे.सईद बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. गुरुवारी किमान समान कार्यक्रमांची(सीएमपी) घोषणा होईल. सईद यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी १ मार्चला होऊ शकतो. शुभदिन मानून ही तिथी निवडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पाऊण तासांच्या बैठकीनंतर या दोघांनी युती सरकारच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली. वेगवेगळ्या मुद्यांवर अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा पार पडली असून किमान समान कार्यक्रमांवर जवळजवळ सहमती झाली आहे. लवकरच जम्मू-काश्मीरच्या जनतेला लोकप्रिय सरकार मिळेल, असे शहा म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)